Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP News: जिल्हा परिषद खरेदी करणार 6 नवीन इलेक्ट्रिक वाहने

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व इतर सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांना सरकारी वाहन पुरवले जाते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेतील जुन्या झालेल्या १६ व पंचायत समित्यांच्या सहा गटविकास अधिकाऱ्यांची सहा अशी २२ वाहने निर्लेखित करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे.

या निर्लेखित केलेल्या वाहनांची विक्री करून येणारी रक्कम तसेच जिल्हा परिषदेकडे जमा असलेला घसारा निधीतून गट विकास अधिकारी यांच्यासाठी सहा नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. (Zilla Parishad to buy 6 new electric vehicles Nashik News)

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व इतर सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांना सरकारी वाहन पुरवले जाते.

सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार या सर्व अधिका-यांना आठ लाख रुपये किमतीचे वाहन मंजूर आहे. हे वाहन दहा वर्षे व अडीच लाख किलोमीटर पूर्ण झालेले वाहन निर्लेखित करण्याचा नियम आहे.

मात्र, वाहने खरेदी करण्यासाठी निधी मिळत नसल्याने नवीन वाहन नसल्याने मुदत संपल्यानंतरही जुनीच वाहने वापरात होती. जिल्ह्यातील १५ गट विकास अधिकारी यांची जवळपास सर्वच वाहनांची मुदत संपून गेली आहे.

मात्र, नवीन वाहने नसल्याने या जुन्याच वाहनांचा वापर केला जात होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या तालुका दौऱ्यावेळी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना नवीन वाहनांबाबत प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते.

तसेच जिल्हा परिषदेच्या सेसमधून वाहने खरेदी करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या सेसमधून वाहने खरेदी करता येत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या घसारा निधीमध्ये सध्या ४८ लाख रुपये असल्यामुळे गटविकास अधिकारी यांना टप्प्याटप्प्याने वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार यावर्षी पहिल्या टप्प्यात सहा वाहनांचे निर्लेखन करून त्यांना प्रत्येकी आठ लाख रुपये किमतीची सहा नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२२ वाहनांचे निर्लेखन

जिल्हा परिषद आस्थापनेच्या अंतर्गत अडीच लाख किलोमीटर चाललेली १६ जुनी वाहने पडून आहेत. ही वाहनेही निर्लेखित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एकूण २२ वाहने निर्लेखित होणार आहेत.

ही वाहने निर्लेखित केल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार

राज्य व केंद्र सरकारने यापुढे सर्व सरकारी वाहने खरेदी करताना प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. यामुळे जिल्हा परिषदेकडून नवीन इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

Heart Health Tips by WHO: जगातील 32% मृत्यू हृदयविकारामुळे; WHO चा इशारा, हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' 5 सवयी

UTU Paper Leak: परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर आले प्रश्न; पेपर लीक प्रकरणी असिस्टंट प्रोफेसरला बेड्या!

SCROLL FOR NEXT