Nashik News: नियोजनबद्ध नाशिकचा आराखडा बनविणार 55 आयआयटीयन्स! सिंहस्थासह इकोसिटी, ट्रॅफिक मॅनेजमेंटचे पर्याय सुचविणार

पुढील दहा दिवस नाशिक शहरामध्ये ही टीम काम करणार असल्याची माहिती महापालिकेच्या नगररचना उपसंचालक हर्शल बाविस्कर यांनी दिली.
Samruddhi Highway
Samruddhi Highwayesakal

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्याबरोबरच वेगाने विकसित होणाऱ्या नाशिक शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या अनुषंगाने खरकपूरच्या आयआयटीच्या ५५ तज्ज्ञांची टीम नाशिकमध्ये दाखल झाली आहे.

शहरातील ट्रॅफिक मॅनेजमेंट, तसेच इकोसिटी बनविण्यासाठी ही टीम स्वतंत्र आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी पुढील दहा दिवस नाशिक शहरामध्ये ही टीम काम करणार असल्याची माहिती महापालिकेच्या नगररचना उपसंचालक हर्शल बाविस्कर यांनी दिली. (55 IITians will make plan for Nashik Eco City with Simhastha will suggest options for traffic management Nashik News)

नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे. समृद्धी महामार्ग, तसेच सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग विकसित होत असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा नाशिकला होताना दिसत आहे. त्याचबरोबर मुंबई-नाशिक महामार्गाचे विस्तारीकरण व काँक्रिटीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली आहे.

नाशिक ते गोंदे व गोंदेपासून जवळपास २० किलोमीटर काँक्रीटचा रस्ता तयार करून समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असल्याने दीड ते दोन तासांच्या अंतरावर मुंबई-नाशिक अंतर येणार आहे. तर सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे दोन्ही महत्त्वाचे शहरे अवघ्या दोन तासांच्या अंतरावर येणार आहे.

यामुळे भविष्यात उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात नाशिकचे वजन वाढणार आहे. मुंबई-पुणे-सुरत या शहरांचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण होऊन उद्योगांचे शहर म्हणून प्रसिद्धी पावली आहे.

त्यामुळे येथे जमिनींचे वाढलेले भाव व उद्योगांसाठी जागा मिळत नसल्याने या तीनही महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मध्यवर्ती भाग म्हणून नाशिककडे पाहिले जाते. त्यामुळे भविष्यात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या व लॉजिस्टिक पार्क नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्या अनुषंगाने विकास होत असताना अवाढव्य प्रकार न होता नियोजनबद्ध पद्धतीने नाशिकचा विकास होणे गरजेचे आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने सध्या कामे घेतली जातात. त्यासाठी सल्लागार कंपनीला करोडो रुपये मोजले जातात.

मात्र खरगपूर आयआयटीच्या ५५ तज्ज्ञांनी वाढत्या नाशिकचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दहा दिवस सदरची टीम नाशिकमध्ये राहणार असून, ट्रॅफिक मॅनेजमेंट व इकोसिटी बनविण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे.

नाशिक महापालिकेच्या नगररचना उपसंचालकांची सोमवारी (ता. ८) आराखडा तयार करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. आयआयटी खरगपूरच्या पथकामध्ये सहाय्यक प्राध्यापक सुमना गुप्ता, श्रेयस भारुडे, रिसर्च स्कॉलर अनुभव कुंभारे यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांमध्ये मास्टर इन सिटी प्लॅनर या अर्हतेचे तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर अनुभवी विशारद, पर्यावरण, ट्रॅफिक नियोजनकार असे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश आहे.

Samruddhi Highway
Nashik News: आडगाव ट्रक टर्मिनस येथे होणार इलेक्ट्रिक बस डेपो! महासभेच्या मंजुरीनंतर स्थायी समितीवर, N- Cap अंतर्गत निधी

सिंहस्थाचेही होणार नियोजन

सन २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये नवीन रस्ते तयार करताना नवीन तंत्रज्ञानाचे रस्ते कसे करायचे, यासाठी मार्गदर्शन आयआयटी खरगपूरचे तज्ज्ञ करणार आहेत.

साधुग्रामसाठी जागा संपादित करून दीर्घकालीन त्याचा वापर करण्यासंदर्भात देखील नियोजन केले जाणार आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पर्यावरणपूरक प्रकल्प साकारण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे.

स्वच्छ व सुंदर नाशिकच्या हवामानाचा विचार करून इकोसिटीच्या दृष्टिकोनातून बांधकाम कसे करता येतील, यावर देखील उपाय सुचविले जाणार आहेत.

"नाशिक शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आयआयटी खरकपूरचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ट्रॅफिक मॅनेजमेंट, इकोसिटी, कुंभमेळा, साधुग्रामचे नियोजनासंदर्भात देखील कल्पना सुचविल्या जातील."- हर्शल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना, महापालिका

Samruddhi Highway
SET Exam: सेट परीक्षा अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com