Nashik ZP News  esakal
नाशिक

ZP Cleanliness Drive : स्वच्छता मोहिमेनंतर जिल्हा परिषद ओस

सकाळ वृत्तसेवा

ZP Cleanliness Drive : जिल्हा परिषद प्रशासनाकडून मंगळवारी (ता. २) गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मुख्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचारी सहभागी होते.

सकाळी स्वच्छता केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेत येणे अपेक्षित असताना, स्वच्छता केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी गायब झाले होते. ठराविक विभागप्रमुख, कर्मचारी वगळता सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेकडे पाठविल्याने जिल्हा परिषद ओस पडली होती. (zp office staff absent after ZP Cleanliness Drive nashik news)

गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सरसावली असून, गोदावरी नदीमधील कचरा स्वच्छ करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे सकाळच्या सत्रात जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी यांनी स्वच्छता केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही मोहीम केवळ दिखावा असल्याचे दिसून आले.

येथील नदीपात्रातील पाणवेली काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने सर्व पाणवेली हटविण्यात आल्या. दाखल झालेल्या ठराविक अधिकारी वर्गाने पात्रात उतरत, स्वच्छता केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, बहुतांश अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्वच्छतेपासून दूर राहणे पसंत केल्याची चर्चा कर्मचारी वर्गात होती. सदर स्वच्छता मोहीम संपल्यानंतर ठराविक विभागप्रमुख जिल्हा परिषदेत दाखल झाले अन त्यांनी आपले दैनंदिन कामकाज केले.

मात्र, बहुतांश अधिकारी तसेच कर्मचारी यांनी मोहिमेनंतर जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत ठराविक विभागप्रमुख वगळता अनेक विभागप्रमुख गैरहजर होते.

तसेच विभागातील कर्मचारी वर्गाची उपस्थितीही नगण्य होती. अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने गर्दी देखील नव्हती. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस असताना देखील जिल्हा परिषदेत सुट्टी आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT