ZP Cleanliness Drive : जिल्हा परिषद राबविणार गोदावरी स्वच्छता मोहीम; लोकसहभागातून करणार स्वच्छता

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal

ZP Cleanliness Drive : दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सरसावली आहे. गोदावरी नदीमधील कचरा स्वच्छ करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून २ मेस विशेष मोहीम हाती घेतली असून, नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे सकाळच्या सत्रात जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी स्वच्छता करणार आहेत.

यात लोकसहभागदेखील घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. तसेच, जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांनी महिन्यातून एकदा जवळील पात्र स्वच्छ करण्याचे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले आहे. (ZP Cleanliness Drive Godavari Cleanliness Drive to be implemented by Zilla Parishad Cleaning will done through public participation nashik news)

गोदावरी नदी स्वच्छतेसाठी शहरात अनेकदा मोहीम राबविली गेली आहे. शहर परिसरात असलेल्या नदी पात्राची स्वच्छता महापालिका यंत्रणा असो की, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ केली आहेत.

परंतु, शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात वाहत जाणाऱ्या नदी पात्राची स्वच्छता मोहीम राबविली गेलेली नाही. यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग २ मेस लाखलगाव परिसरातून वाहत असलेल्या नदी पात्राची स्वच्छता करणार आहे.

त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सर्व विभागप्रमुखांना तत्काळ पत्र काढत, सर्व कर्मचारीवर्गाला ही स्वच्छता मोहीम बंधनकारक केली आहे. महापालिकेकडून शहरातील नदी पत्राची स्वच्छता केली जाते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातदेखील विवीध गावांमध्ये ग्रामस्तरावर हे गोदा स्वच्छता मोहीम घेऊन स्वच्छता केली पाहिजे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
NMC News : झोपडपट्टी स्वच्छतेसाठी आयुक्त मैदानात; लेखानगर झोपडपट्टीचा घेतला आढावा

त्यासाठी मित्तल यांनी गावांना महिन्यातील एक दिवस स्वच्छतेसाठी देण्याचे आवाहन केले आहे. गोदावरी स्वच्छ ठेवणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. लोकसहभागाशिवाय आपली नदी स्वच्छ राहू शकत नाही. जर गावातील लोकांनी ठरवले तर स्वच्छ होऊ शकते.

त्यामुळे ग्रामस्तरावरून हा उपक्रम यशस्वी होणे आवश्यक असल्याचे मित्तल यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी शहरात राबविल्या गेलेल्या स्वच्छता मोहिमेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांसह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला होता.

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
APMC Election: बाजार समितीच्या मतमोजणीवेळी राडा; माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार यांच्यात हाणामारी video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com