result esakal
नाशिक

ZP School Result : जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शनिवारी मिळणार निकालपत्र

राजर्षी छत्रपती शाहू वर्षाची सांगता करून निकाल देण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

ZP School Result : दरवर्षी महाराष्ट्रदिनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा निकाल जाहीर करण्यात येतो. यंदाही सर्व शाळांमध्ये गुरुजींनी निकालपत्रक तयार करून ठेवले आहे. विद्यार्थी -पालकांनाही निकालाची ओढ लागलेली आहे.

मात्र, निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला हा निकाल पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाऐवजी या यंदा छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी अर्थात ६ मे रोजी हा निकाल देण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यामुळे निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली. (ZP School Result students will get result on Saturday nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राज्यातील प्राथमिक व उच्च शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये केल्या एकवाक्यता आणण्यासाठी २०२३ ची उन्हाळ्याची सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत.

या शिवाय निकालासंदर्भातही पत्र काढले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन असून, राजर्षी छत्रपती शाहू वर्षाची सांगता ६ मे रोजी होत आहे. . महाराष्ट्र दिन आणि छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनी महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर ६ मे रोजी शाळांचा निकाल जाहीर करावा व गुणपत्रकांचे वाटप करावे.

निकालासोबत विविध उपक्रमांचे आयोजन करून शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करावा अशा सूचना शिक्षण संचालक यांनी दिल्या आहेत. या पत्रानुसार मुलांना सहा मे रोजी निकालासाठी बोलावले जाणार आहे. या बाबतच्या सूचना तालुका गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी कोळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या आज सेवा संस्थांमध्ये, यादीत नाव असल्याची खात्री करावी; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Akole Flood: महापुराने अकोलेचा पश्‍चिम पट्टा वेढला, दरड कोसळल्यानं दहा गावांचा संपर्क तुटला; जमिनी वाहिल्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT