Nashik ZP Gram Sevak Award : 5 वर्षांपासून ग्रामसेवक पुरस्कारांपासून वंचित

नाशिक जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक पुरस्कार रखडले
ZP Nashik news
ZP Nashik newsesakal

Nashik ZP Gram Sevak Award : ग्रामविकास हा ग्रामविकासाचा कणा असून ग्रामीण भागातील विकासामध्ये त्यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. ग्रामसेवकांच्या कामांचे मूल्यमापन होऊन गावची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी, या करिता शासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना आणली.

परंतु, गत पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवकांचे वितरण केले नाही. त्यामुळे दरवर्षी १५ या प्रमाणे पाच वर्षातील ७५ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारापासून वंचित आहेत. (Nashik ZP Gram Sevak Award Deprived of Gram Sevak Awards for 5 years)

गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना योजना जाहीर केलेली आहे. ग्रामसेवकांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन पुरस्कार देण्यात येतात.

उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना पुरस्कार देण्यात येतात. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार ग्रामसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्याची तरतूद शासनाने केली आहे.

प्रत्येक पंचायत समितीस्तरावरून एक ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी असे दोघे या पुरस्कारासाठी निवडायचा असून त्यांचा कामाचा प्रस्ताव विस्तार अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागास सादर करायचा असतो.

सादर झालेल्या प्रस्तावातून अंतिम यादी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली पूर्ण होते. महात्मा गांधी जयंतीदिनी गावाच्या विकास वर्षाची सुरवात म्हणून या दिवशी हे पुरस्कार देणे क्रमप्राप्त आहे. ग्रामसेवकांच्या कामाचे श्रेय म्हणून त्यांना पगारात एक वेतनवाढ देण्याचे धोरण आहे.

मात्र, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून जिल्हा परिषदेकडून हे पुरस्कार जाहीर झालेले नाहीत. कोरोनाचे संकट त्यानंतर, प्रशासकीय राजवट आदींचा फटका पुरस्कारास बसल्याने ते वेळात जाहीर होऊ शकलेले नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ZP Nashik news
Aviral Godavari : नाशिककरांनो ! सहभागी होऊ यात, ‘अविरल गोदावरी' चळवळीत !

पाच वर्षाचे पुरस्कार रखडले

सन २०१६-१७, सन २०१७-१८, सन २०१८-१९, सन २०१९-२०, सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पुरस्काराचे वितरण झालेले नाही. यातील दोन वर्ष कोरोनात गेल्याने पुरस्कार वितरण होऊ शकलेले नाही.

अधिकृत घोषणेची प्रतिक्षा

गत पाच वर्षांपासून अरोरात्र गावाच्या विकासासाठी काम करूनही यातही कोरोना संकटातही गावात काम केलेले असताना पुरस्कार वितरणास विलंब होत असल्याने ग्रामसेवक संघटनेने गत आठवड्यात आक्रमक भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

ग्रामसेवक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ग्रामपंचायत विभागाकडून तातडीने याबाबतची फाइल फिरली अन पुरस्कार प्रस्तावाची फाइल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी गेल्याचे समजते.

आठवड्यात पुरस्काराची घोषणा होऊन८ मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

ZP Nashik news
Upanayan Sanskar : बटूंचा उपनयन संस्‍कार सोहळा उत्‍साहात! शाही थाटातील सोहळ्याने भारावले कुटुंबीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com