उत्तर महाराष्ट्र

धुळे : केमिकल कंपनीतील स्फोटानंतर आता विषारी वायूची गळती; श्वसनात अडचणी

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : वाघाडी ता.शिरपूर येथील रुमित केमसिंथ उद्योगात आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर संयंत्रातून विषारी वायूची गळती सुरू झाली आहे. ग्रामस्थांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अनेकांनी नातलगांकडे वा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. 

संयंत्रातील रसायनांचे अर्धवट ज्वलन होऊन काळा धूर बाहेर येत आहे. त्यामुळे हवेत आम्लाचा गंध पसरला आहे. दुर्घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या राज्य आपत्ती नियंत्रण दलाचे तीन जवान बेशुद्ध झाले असून, त्यांना धुळे येथे हलवण्यात आले आहे. या कारखान्यापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या वाघाडी येथील ग्रामस्थांना श्वसन मार्गात जळजळ, डोकेदुखी, उलट्या असा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे संभाव्य अनिष्ट टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी सुरक्षित जागी आश्रय घेतला आहे.

दरम्यान, रिऍक्टरमधील रसायनांचा दुर्गंध हवेत असून, वायूगळती नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT