crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : खासगी लाचखोर नवापूर येथे गजाआड; ‘एसीबी’च्या पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : नवापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयितांची प्रतिबंधात्मक कारवाई अधिकाऱ्यांना सांगून थांबविण्यासाठी एकाने संबंधित तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्वीकारताना मंगळवारी (ता. २१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (Private bribery in Navapur arrest by ACB nandurbar crime news)

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार भादवड (ता. नंदुरबार) येथील रहिवासी ३५ वर्षीय तक्रारदार व त्यांच्यासह १३ जणांविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

त्या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या इतर साथीदारांवर केलेली प्रतिबंधात्मक कारवाई नवापूर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगून बंद करून देण्यासाठी हनू ऊर्फ अनक रामा वळवी (वय ३२, रा. सोनारे दिगर, ता. नवापूर) या खासगी व्यक्तीने तक्रारदाराकडून प्रथमतः प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे १३ जणांचे एकूण १३ हजार रुपयांची मागणी केली होती.

मात्र, तक्रारदाराने तेवढे देण्याबाबत असमर्थता दाखविली. शेवटी तडजोडीअंती १० हजार रुपयांत तंटा मोडण्याचे ठरले. त्यानुसार दहा हजार देण्याचे निश्‍चित झाले होते. त्यापैकी सात हजार रुपये तक्रारदाराकडून संशयित हनू वळवी याने आधीच स्वीकारले होते. उर्वरित तीन हजारांसाठी तो तगादा लावत होता.

तक्रारदाराने संशयित वळवी यास मंगळवारी ते देण्याचे निश्‍चित केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी नवापूर तहसील कार्यालय परिसरात तीन हजारांची रक्कम देण्याचे निश्‍चित केले. तशी वेळ व ठिकाण निश्‍चित असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला होता.

ठरलेल्या वेळेनुसार ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्वीकारताना हनू वळवीला रंगेहाथ पकडण्यात आले. पंचनामा करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावित, पोलिस नाईक संदीप नावाडेकर यांनी केली. त्यांना पोलिस निरीक्षक समाधान वाघ, निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विजय ठाकरे, हवालदार ज्योती पाटील, जितेंद्र महाले यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT