Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

2 लाखांपोटी 23 लाखांची वसुली; शिपायावर सावकारीचा दुसरा गुन्हा

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील राज्यस्तर समाजकल्याण विभागाचा शिपाई आणि सध्या देवपूरमधील वसतिगृहात नेमणूक असलेला रवींद्र शिरसाट अवैध सावकार (unauthorized money lender) असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या व्यवसायासाठी त्याला अभय कुणाचे, याचाही शोध पोलिसांनी घेण्याची मागणी होत आहे. (Recovery of Rs 23 lakh for Rs 2 lakh fake money lender crime dhule crime news)

अवैध सावकार शिरसाट याने मासिक दहा टक्के व्याजदराने दोन लाखांचे कर्ज दिले. त्यापोटी २३ लाख रुपये वसूल करूनही तो असमाधानी राहिला. त्याने तक्रारदाराची शेती जबरदस्तीने नावावर करून घेतली. मूळ कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सावकार शिरसाट याने संबंधित कुटुंबाला त्रास देणे सुरू केले. पीडित कुटुंबाच्या घरी जाणे, शिवीगाळ व दमदाटी करणे सुरूच ठेवले. त्यामुळे तक्रारदार पीडित तरुणाने अवैध सावकार शिरसाट याच्यासह तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

धुळे शहरातील जमनागिरी रोड परिसरात भावसार कॉलनी आहे. तेथील प्लॉट क्रमांक २५ मधील रहिवासी महेश माधव मोरे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१२- १३ मध्ये भावसार कॉलनीतच प्लॉट क्रमांक ३३ मधील रहिवासी रवींद्र अर्जुन शिरसाट आणि भिकूबाई अर्जुन शिरसाट यांच्याकडून फिर्यादीचे वडील माधव शंकर मोरे यांनी दोन लाखांचे कर्ज घेतले होते. व्याजाचा वार्षिक दर तब्बल १२० टक्के आकारला.

व्याज आणि मुद्दलापोटी दरमहा वीस हजार याप्रमाणे २०१७ पर्यंत दहा लाख ८० हजार रुपये फेडले. त्यानंतर मे २०१९ मध्ये चार लाखांचा धनादेश, तसेच ३ डिसेंबर २०१९ ला आठ लाख ४० हजार किमतीची सोंडले (ता. शिंदखेडा) शिवारातील गट क्रमांक ८९/१/ब मधील शेती शिरसाटच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार किरण मच्छिंद्र जाधव (रा. विखे नगर, शेलारवाडी, चितोड रोड, धुळे) याच्या नावावर जबरदस्तीने करण्यास भाग पाडण्यात आले. आतापर्यंत शिरसाटला व्याजासह २३ लाख २० हजार रुपये परत केले आहेत. असे असताना कर्ज घेणारे माधव शंकर मोरे यांचे निधन झाले. तरीही या संशयित तीन सावकारांनी (स्व.) माधव मोरे यांच्या घरी जात मुलगा महेश व कुटुंबीयांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानुसार संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT