Ongoing repair of Rozwa Micro Irrigation Project. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती सुरू! सांडव्याची गळती थांबणार

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि. नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कोठार येथील रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या दुरुस्तीला पाटबंधारे विभागाकडून अखेर सुरवात करण्यात आली. यासाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण काम होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Repair of Rozawa Small Irrigation Project started Spillage will stop Nandurbar News)

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन गावाच्या पुढे कोठार गावाजवळ रोझवा लघुसिंचन प्रकल्पाची निर्मिती पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पाची जलसाठ्याची क्षमता एकूण १.७४ दशलक्ष घनमीटर आहे. दर वर्षी पावसाळ्यात या लघुसिंचन प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा होत असतो. मात्र लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने भिंतीमधून पाण्याची मोठी गळती लागलेली असते.

यामुळे या प्रकल्पातील साठा फारच अल्पजीवी ठरत होता आणि दररोज प्रकल्पातून होणाऱ्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाहून जायचे. पूर्ण क्षमतेने भरलेला हा लघुसिंचन प्रकल्प उन्हाळ्याच्या सुरवातीलाच म्हणजे मार्च महिन्यात पूर्णपणे कोरडाठाक झाल्याचा अनुभव दर वर्षी शेतकऱ्यांना येत होता. त्यामुळे लघुसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

शेतकऱ्यांची मागणी उशिरा का होईना पण मान्य करण्यात आली असून, पाटबंधारे विभागाकडून रोझवा लघुसिंचन प्रकल्पाच्या साडव्यामधून होणारी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

यासाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ठेकेदाराकडून कामाला सुरवात करण्यात आली आहे. सांडव्याच्या आतील बाजूला दुरुस्तींतर्गत काँकिटचे जॅकेटिंग करण्यात येत आहे, तर सांडव्याच्या आतील बाजूला काँक्रिटची एक मोठी भिंत उभारण्यात येत आहे.

जवळपास निम्म्यापेक्षा अधिक दुरुस्तीचे काम झालेले असून, पुढील आठवड्यापर्यंत काम पूर्णत्वास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रोझवा लघुसिंचन प्रकल्पाप्रमाणेच पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या प्रकल्पांचीदेखील दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा

रोझवा लघुसिंचन प्रकल्पतील जलसाठा, पाण्याचा अपव्यय व दुरुस्ती हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शेतकरी बांधवांचा जिवाळ्याच्या विषय आहे. अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येऊन जलसिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे सांडव्याची दुरुस्ती होत असताना ठेकेदाराने इस्टिमेटनुसार गुणवत्तापूर्ण काम करावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीदेखील या कामाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण काम होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT