SETU : कोरोनाकाळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा सेतू

Students
StudentsSakal

धुळे : कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे वर्षभर शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा ‘सेतू’ (SETU) अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.

दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिकशास्त्र या विषयांसाठी मराठी, ऊर्दू आणि इंग्रजी माध्यमातील ‘सेतू’ अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून, शाळा सुरू झाल्यानंतर ३० दिवसांत या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Students
Hostels For Students: मुंबई-दिल्लीत उभारणार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे; जयदत्त क्षीरसागर

कोरोनाकाळात शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदा ‘सेतू’ अभ्यासक्रम राबविण्यात आला. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी केलेल्या अभ्यासात ‘सेतू’ अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले.

मात्र, गेल्या वर्षभरात शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू नव्हत्या. तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांतील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा ‘सेतू’ अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची माहिती देण्यासाठी ९ जूनला ऑनलाइन पद्धतीने उद्‍बोधन सत्र घेतले जाणार आहे.

Students
Students Mental Health : यश की अपयश? परीक्षेची भीती वाटते? असे करा स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार...

विद्यार्थ्यांच्या आधीच्या इयत्तांतील महत्त्वाच्या क्षमता पूर्ण होण्याच्या दृष्टीने ‘सेतू’ अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थिकेंद्रित आणि कृतिकेंद्रित अशा दिवसनिहाय कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

परिपत्रक जारी

विद्यार्थी हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे कृतिपत्रिकांचे स्वरूप आहे. ‘सेतू’ अभ्यासक्रमापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वचाचणी व ‘सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची उत्तरचाचणी घेतली जाईल.

‘सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ‘सेतू’ अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीनुसार पूर्वचाचणी १७ व १८ जून, ३० दिवसांचा ‘सेतू’ अभ्यासक्रम २० ते २३ जुलै, तर उत्तरचाचणी २५ ते २६ जुलैदरम्यान घेण्याचे शाळांना सूचित करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने परिपत्रक जारी केले आहे.

Students
Student Scholarship : विद्यार्थी शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित; NSUI आयुक्तांना निवेदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com