उत्तर महाराष्ट्र

विवाह न जमणाऱ्यांच्या जुळविणार रेशीमगाठी! 

सकाळन्यूजनेटवर्क

विवाह न जमणाऱ्यांच्या जुळविणार रेशीमगाठी! 


जळगाव : मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळविताना आई-वडिलांना फिरफिर करावी लागते. यात मुलीच्या आणि त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे अनेकांचे विवाह जुळत नाहीत. योग्य वधू-वरांची शोधाशोध करताना वयाची तीस वर्षे पूर्ण होऊन जातात आणि विवाह जुळणे कठीणच होते. अशा विवाह न जुळलेल्या 30 ते 45 वर्षे वयापर्यंतच्या व्यक्‍तींच्या रेशीमगाठी जुळविण्यासाठी भूषण आग्रे यांनी पुढाकार घेतला आहे. वधू-वर सूचक संस्था स्थापन करणार असून, संस्था स्थापनेपूर्वी व्हॉटस्‌ऍप ब्रॉडकास्टिंग ग्रुपच्या माध्यमातून संपर्काला सुरवात केली आहे. 
आजचे युग धावपळीचे आहे. या काळात समाजात फिरताना मुलगी किंवा मुलाचे विवाह जुळविण्यासाठी आई-वडिलांची धावपळ असते. विवाह जुळविताना मुलीच्या आई-वडिलांच्या असलेल्या अपेक्षेप्रमाणे मुलगा मिळत नाही. हीच परिस्थिती मुलीचा शोध घेताना निर्माण होते. यामुळे मुलगी किंवा मुलाचे वय वाढत जाते. प्रत्येक समाजात लग्न न झालेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. शिवाय प्रत्येक समाजाचे वधू-वर परिचय मेळावे आयोजित करून लग्न जुळविण्याचे काम करतात, तरीही अधिक वय झालेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्‍न कायम राहतो. अशांसाठी वधू-वर सूचक संस्था स्थापन करून त्यांचे विवाह जुळविण्याच्या कामास सुरवात केली आहे. 

आठ दिवसांत 35 अर्ज 
विवाह जुळविण्यात प्रामुख्याने 30 ते 45 वर्षे होऊन गेले असताना लग्न न झालेल्या व्यक्‍तींची नोंदणी करता येईल. जेणेकरून प्रत्येक वधू-वरास आपला साथीदार शोधता येणे सोपे होईल. त्याचबरोबर विधवा, विदूर, घटस्फोटित, अपत्य असलेल्या व्यक्‍तींनाही नोंदणी करता येणार आहे. याकरिता इंडसइंड बॅंकेचे शाखा व्यवस्थापक भूषण आग्रे वधू-वर सूचक संस्था स्थापन करणार आहेत. ही संस्था स्थापन होण्यापूर्वी व्हॉटस्‌ऍप ब्रॉडकास्टिंग ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करणे सुरू केले आहे. तसेच अर्ज मागविण्यासही सुरवात केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या कामाला सुरवात केली असून, आठ दिवसांत 35 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

मुला-मुलींचे विवाह जुळविण्यात वय वाढत जाते. यात तिशी ओलांडल्यानंतर विवाह जमणे कठीण होते. अशा व्यक्‍ती प्रामुख्याने 30 ते 45 वर्षांमधील मुला-मुलींचे विवाह जुळविण्याचे काम करणार आहे. 
- भूषण आग्रे, शाखा व्यवस्थापक, इंडसइंड बॅंक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT