47 workers are absent in training of Gram Panchayat Election 
विदर्भ

ग्रामपंचायत निवडणूक: प्रशिक्षणाला काही कर्मचाऱ्यांनी मारली दांडी; महसूल प्रशासन बजावणार कारणे दाखवा नोटीस

शेखर चौधरी

मोर्शी (जि. अमरावती) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून मोर्शी तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे.

या मतदानाची पूर्वतयारी म्हणून मोर्शी महसूल प्रशासनाच्या वतीने 31 डिसेंबर व 1 जानेवारीला कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक शिवाजी हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला पहिल्याच दिवशी 47 कर्मचारी अनुपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावणार आली असल्याचे सांगण्यात आले.

मोर्शी तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेमध्ये सुरळीतपणे राहावा यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिलेले आहे. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील शिवाजी उच्च माध्यमिक शाळा येथील वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येकी चाळीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या प्रशिक्षण शिबिरासाठी दहा मास्टर ट्रेनर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु या महत्त्वाच्या कामामध्ये सुद्धा 47 कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.

या प्रशिक्षणामध्ये उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिये मध्ये घ्यावयाची काळजी या संदर्भात तहसीलदार सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार निवडणूक विभाग श्री. चव्हाण, नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांनी मार्गदर्शन केले. मोर्शी तहसील मधील 39 ग्रामपंचायती मध्ये होऊ घातलेल्या 349 जागेकरिता 900 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 20 अर्ज विविध कारणाने रद्द झाले असून 880 उमेदवार रिंगणात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT