esakal | 'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Man in Yavatmal  district feeding food to crows from last 15 years

मरावती ते यवतमाळ महामार्गावर ही गोष्ट घडते. आता तुम्ही म्हणाल की ते असं करतात तरी का? त्यामागे एक रंजक गोष्ट आहे.

'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

यवतमाळ : रस्त्यावर कबुतरांना किंवा पाळीव पक्ष्यांना खाद्यपदार्थ किंवा धान्य खाण्यासाठी देणाऱ्या अनेकांना तुम्ही बघितलं असेल. अनेकदा तुम्हीही पक्ष्यांना दाणे खाण्यासाठी दिले असतील. पण तुमच्यासमोर कावळा आला तर बहुदा तुम्ही असं करणार नाही. पण यवतमाळ जिल्ह्याच्या एका अवलियानं हे काम करून दाखवलंय. त्याच्या या कामामुळे असंख्य कावळे त्यांच्या आगमनाची आतुरतेनं वाट बघत असतात. इतकंच काय तर ते आल्याबरोबर त्यांच्याभोवती जमतात. पण हे कौतुकास्पद काम नक्की आहे तरी काय?  

आम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहोत त्यांचं नाव आहे मिर्झा रहिमबेग. रहीम भाई दररोज शेकडो कावळ्यांना आपल्या हातानं  दाणे देतात किंवा अन्न देतात.  अमरावती ते यवतमाळ महामार्गावर ही गोष्ट घडते. आता तुम्ही म्हणाल की ते असं करतात तरी का? त्यामागे एक रंजक गोष्ट आहे.

जाणून घ्या - रामदेव बाबा गेले, अंबानी अडचणीत; मिहान, एमआयडीसीत उद्योजकांचा थंड प्रतिसाद

मिर्झा रहिमबेग यांची गाडी एके दिवशी मालखेड गावााजवळ बंद पडली. त्यामुळे ते गाडी दुरुस्त होईपर्यंत गाडीजवळ थांबले होते. त्यांना भूक लागल्यामुळे त्यांनी जवळचे बिस्किट खाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भुकेने व्याकुळ झालेला एक कावळा त्यांच्याकडे आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा कावळा त्याच ठिकाणी आला आणि पुन्हा रहिमभाई यांनी त्याला बिस्किट दिले. 

तिसऱ्या दिवशी कावळा आपल्यासोबत आणखी काही कावळे घेऊन आला. त्यावेळी राहिमभाई यांनी घरची खिचडी आणि काही बिस्किटं त्यांना दिली. त्याला रहीमभाई यांनी जवळचे एक बिस्कीट दिले. त्यानंतर तो कावळा पुन्हा दुसरे बिस्किट मिळेल या आशेने पाहु लागला पुन्हा राहिमभाई यांनी बिस्किट दिलं. झालं मग काय कळवळ्यांच्या कळपाला याची खबर मिळाली आणि दररोज शेकडो कावळे तिथे जमा होऊ लागले. 

गाडीचा हॉर्न वाजताच.... 
 
मालखेड गावाजवळच्या उंचटेकडी भागात पोहोचताच रहिमभाई गाडीच्या हॉर्न वाजवतात. तो आवाज ऐकताच कावळ्यांचा थवा मग मित्र आल्यावर जिकडे असेल तिकडून गाडीच्या पुढे मागे पाठलाग करत येतात. अगदी काही सेकंदाच्या आत असंख्य कावळ्यांच्या थवा रहिमभाई यांनी आणलेल्या खाऊवर तुटून पडतो. अवघ्या काही मिनिटात आणलेला खाऊ संपतो. 

कावळ्यांना रहीम भाईंचा लळा 

नेहमी कावळे माणसांपासून दूर राहतात मात्र रहीम भाईंच्या अंगा खांद्यावर कावळे खेळताना दिसतात. त्यामळे कावळ्यांनाहे रहीम भाईंचा लळा लागलाय हीच चिन्हं दसून येतात. 

सविस्तर वाचा - Sad Story : तीनचाकी रिक्षावर चालतो गुलमोहम्मद शेखचा व्यवसाय; सोहाळ्या वर्षांपासून लागले कामाला

पत्नीही प्रेमानं तयार करते जेवण  

ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने रहिमबेग यांना प्रत्येक ठिकाणी वेळेत सामान पोहोचवण्यासाठी यवतमाळच्या घरून भल्या पहाटे निघावं लागतं. त्यांच्या पत्नी गेल्या १५ वर्षांपासून खाद्यपदार्थ बनवून देतात आणि रहीम भाई सकाळी 5.45 च्या सुमारास घरून खिचडी बनवून आणतात तर कधी शेव, पापडी, बिस्किट असं अन्न आणतात. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image
go to top