Addictions are increasing in youth  
विदर्भ

तरुणाई अडकतेय आँनलाइन जुगाराच्या गर्तेत; गेम खेळण्याचे प्रमाण वाढले, अनेक जण देशोधडीला

रुपेश खैरी

वर्धा : ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना काळातील सक्तीचा लॉकडाउन , सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती, बिकट आर्थिक परिस्थिती आणि पैसा मिळविण्याचा भाबडा आशावाद यामुळे ऑनलाइन जुगार खेळणारे वाढले आहेत. तरुणाई जुगाराच्या गर्तेत अडकत चालली असून त्यांना रोखण्याचे आव्हान पालक आणि पोलिसांसमोर आहे.

सध्या विविध वेबसाईट आणि ऍप्सच्या माध्यमातून जुगार चालत आहे. कोरोनाच्या काळात मोठ्या लॉकडाउनला सामोरे जावे लागले. त्यामध्ये वेळ घालविण्यासाठी अनेक जण या प्रकारच्या जुगार आणि गेमच्या आहारी गेले आहेत. आर्थिक फायद्याच्या जाहिराती दाखवल्या जात असल्याने काही जण या आमिषाला भुलले तर काही ठिकाणी शासनमान्य व्हिडिओ पार्लरच्या आडून छुप्या पद्धतीने ऑनलाइन जुगार चालविला जात आहे. ऑ

नलाइन जुगारामध्ये गेम्स डेव्हलपर, मालक, डीलर आणि सबडिलर अमाप पैसा कमावीत असून जुगार खेळणारे मात्र रस्त्यावर येत आहेत. या प्रवृतीविरोधात कठोर कारवाई करून आळा घालणे गरजेचे आहे.

ऍपसवर बंदी गरजेची

ऑनलाइन जुगार तसेच गेम्सची माध्यमे उपलब्ध करून देणाऱ्या बहुतांश कंपन्यांचे सर्व्हर बाहेर प्रदेशांमध्ये आहेत. त्या देशात या प्रकारचा गुन्हा ठरत नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यामध्ये मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अशी संकेतस्थळे आणि मोबाईल ऍप वर बंदी घालणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT