आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

सुनील हिरास 
Sunday, 17 January 2021

मनोरूग्ण असलेल्या तरुणाने हाताची नस कापल्याने त्याला दुचाकीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेत असताना

दिग्रस (जि. यवतमाळ) : मनोरूग्ण असलेल्या तरुणाने हाताची नस कापल्याने त्याला दुचाकीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेत असताना चक्क धावत्या एसटी बससमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी (ता.17) रविवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली.

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

सुशांत प्रल्हाद खंडारे (वय 34, रा. वाईगौळ, ता. मानोरा), असे मृताचे नाव आहे. त्याने राहत्या घरी भाजी कापण्याच्या चाकूने हाताची नस कापली होती. त्यामुळे त्याला दिग्रस येथे उपचारासाठी दुचाकीवरून नेत असताना त्याने अचानक दिग्रस येथील मुख्य रस्त्यावर असणार्‍या लक्ष्मी पेट्रोल पंपासमोरून जाणार्‍या नागपूर-कंधार एसटी बससमारे उडी घेतली. 

यात सुशांतच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळासाठी दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. सुशांतचे वडील प्रल्हाद हिरामण खंडारे नेव्हीतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांना सुशांत हा एकुलता एक मुलगा होता. मनोरग्ण असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man end his life by jumping front of bus in Yavatmal