Crime esakal
विदर्भ

Crime News : मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घालून केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर...

सकाळ वृत्तसेवा

अकोलाः मद्यपी वडिलांमुळे आईला होणारा त्रास सहन न झाल्याने रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. ही घटना शुक्रवारी अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कृषी नगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास अटक केली आहे.

कृषी नगरात भाड्याने खोली करून राहणाऱ्या मायाबाई किशोर पाईकवार यांच्या तक्रारीनुसार त्या मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी गावच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे पती किशोर विश्राम पाईकवार (४०) दररोज दारू पिऊन घरी यायचे मुलांना व पत्नीला मारहाण करायचे.

दररोजच्या त्रासाला कंटाळून माया पाईकवार यांनी वर्षभरापूर्वीच गाव सोडले आणि त्या दोन मुलांना घेऊन अकोल्यातील कृषी नगरात राहण्यास आल्या. या ठिकाणीही पती किशोर पाईकवार यांनी शुक्रवारी दारू पिऊन धुडगूस घालण्यास सुरुवात केली.

वडील आई व लहान भावास दगडाने मारहाण करीत असताना मोठा मुलगा जितेंद्र किशोर पाईकवार(१९) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रागाच्या भरात त्याने वडिलांच्या हातातील दगड घेऊन त्यांच्या डोक्यावर मारला. यातच किशोर पाईकवार यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भाऊराव घुगे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. मुलाला अटक केली असून, रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. वडिलांच्या डोक्यावर दगड मारल्याने वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यामुळे घाबरलेल्या जितेंद्र पाईकवार याने त्याच्या मावस भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.

घरात पसरलेले रक्त त्याने पुसून काढले आणि ज्या दगडाने वडिलांना मारहाण करून हत्या केली तो दगड देखील त्याने पाण्याने धुऊन काढला व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT