nana patole nana patole
विदर्भ

‘केंद्र, राज्यातील दोन्ही सरकार बरखास्त करा; मग बघा...’

सत्तेची गुर्मी असलेले लोकं असे वक्तव्य करतात

अभिजित घोरमारे

भंडारा : पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शिवसेनेवर टीका केली. महाविकासआघाडीला लक्ष केले. हे तीन ऑटोचे सरकार तीन दिशेने जात आहे. त्यांची चाकेही पंक्चर झालेली आहे. निव्वळ धूर फेकत आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान त्यांनी केले. यावर केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकार बरखास्त करा व निवडणुका घ्या. म्हणजे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल असे, क्रॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) म्हणाले.

पुणे ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. त्यांनी म्हटले होते की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु, शिवसेना म्हणते सत्ता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही ती मिळवणारच. एकवेळ तुम्ही मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) बनलात. मी आजही म्हणतो जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपशी दोन हात करा. तिन्ही पक्षाशी एकसाथ लढायला भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. महाराष्ट्राची जनता देखील हिशोब करायला तयारच आहे, असे अमित शहा म्हणाले होते.

सत्तेची गुर्मी असलेले लोकं असे बेताल वक्तव्य करतात. केंद्राच्या विरोधात नागरिकांमध्ये चांगलाच राग आहे. तेव्हा केंद्र सरकारने आधी राजीनामा द्यावा. केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकार बरखास्त करा व निवडणुका घ्या. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी (Amit Shah) असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. लोकशाहीचा सन्मान करायला शिका, असेही नाना पटोले (nana patole) म्हणाले.

हिंदुत्व आणि हिंदू याबाबत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. कोरोना काळात गंगा नदीत प्रेत वाहत असताना हिंदुत्व कुठे गेले होते. तेव्हा नाही का आठवले हिंदुत्व. लोकशाहीत जनताच ठरवते चाके कोनाची पंक्चर आहे. सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. दुसऱ्यांवर बोट उचलण्याची गरज नाही. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही नाना पटोले (nana patole) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा दुधगाव-खोची बंधारा खुला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT