Lockdown : ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ

ब्रिटेनमध्ये कोरोनाचा (coronavirus) नवीन प्रकार ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. येथे ओमिक्रॉन (omicron variant) संक्रमणाचा दरही जास्त आहे. यामुळेच सरकार ख्रिसमसनंतर (christmas) दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची (lockdown) योजना आखत आहे. लॉकडाऊन लावून ओमिक्रॉनवर आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मसुदा नियम तयार केला जात आहे. यामध्ये व्यवसायाचा अपवाद वगळता इनडोअर मीटिंग्जवर बंदी घालणे आणि पब आणि रेस्टॉरंट्सना बाह्य सेवेपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आहे. प्लान सी अंतर्गत ब्रिटनचे (britain) पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना सौम्य निर्बंधांपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक पर्याय सादर करण्यात आले आहेत.

हेही वाचा: क्षणाची हौस बेतली जीवावर; २१ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू

आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ब्रिटिश सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार गटातून बाहेर पडलेल्या तपशिलांवरून असे दिसून आले आहे की शास्त्रज्ञांनी मंत्र्यांना चेतावणी दिली आहे की राष्ट्रीय आरोग्य सेवेला आटोपशीर पातळीवर हॉस्पिटलायझेशन कमी करण्यासाठी खूप लवकर कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा कहर

ब्रिटनमध्ये (britain) शुक्रवारी कोविड-१९ संसर्गाची विक्रमी ९३,०४५ प्रकरणे नोंदवली गेली. जे गुरुवारी नोंदवलेल्या ८८,३७६ प्रकरणांपेक्षा ४,६६९ने अधिक आहेत. अशावेळी मीडिया रिपोर्टमध्ये पुन्हा लॉकडाऊन निर्बंधांची माहिती देण्यात आली आहे. डेल्टा प्रकार देशाच्या बहुतेक भागांमध्ये पसरलेला आहे. परंतु, ओमिक्रॉन (omicron variant) संसर्गाची प्रकरणे लंडन आणि स्कॉटलंडमध्ये वेगाने वाढली आहेत. लंडनच्या रुग्णालयांमध्ये कोविड-१९ बाधितांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८.६ टक्क्यांनी वाढून १,५३४ झाली आहे.

Web Title: Omicron Variant Coronavirus Britain Lockdown Christmas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..