Amravati  
विदर्भ

Amravati : अंगणवाडी मदतनीस पदासाठी उच्चविद्याविभूषित महिलांचे अर्ज; ४१ महिलांची निवड

गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडीत मदतनीस यांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी शासनाच्या वतीने भारती प्रक्रिया राबविल्यानंतर दहावा वर्ग शिकलेल्या महिलांपासून तर एम. ए झालेल्या महिलांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे बेरोजगारीचे गांभीर्य सर्वांपुढे आले आहे.

अंगणवाडी मदतनीसच्या जागा रिक्त असल्यामुळे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात अंगणवाडी असल्याने तेथील नागरिक आपल्या लहान बालकांना शिक्षणाची किंवा चांगल्या सवयी लागाव्या म्हणून शासनाने प्रत्येक गावात अंगणवाडीची सोय केली.

त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या बालकांना त्या अंगणवाडी दाखल करतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची बालकांच्या देखरेखीसाठी आवश्यकता असल्याने मदतनीसचे हे पद त्या बालकांच्या साठी उपयुक्त आहे. त्यासाठी न्यूनतम शिक्षणाची अट असताना उच्च शिक्षित असलेल्या उमेदवारांनी सुद्धा आपले अर्ज दाखल केले.

यात दहावा वर्ग पास पासून एम. ए, एम. एस. सी, एम कॉम, बी. एड, डी. एड अशा उच्चविद्याविभूषित महिलांनी सुद्धा अर्ज दाखल केले. यावरून राज्यात किती बेरोजगारी आहे याचा प्रत्यय येतो. शुक्रवारी (ता. ३०) येथील पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प विभागात झालेल्या निवड प्रकियेत मदतनीस महिला निवडल्या गेल्या.

त्यांच्या गुणांनुसार त्यांना पात्र अपात्र करण्यात आले. त्यामध्ये अंगणवाडी मदतनीस यासाठी ४१ पात्र उमेदवार ठरले असल्याने त्यांना आज अंजनगाव पंचायत समिती मध्ये महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात पत्र देण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी शरयू धुमाळे, प्रज्वल ठेलकर, विस्तार अधिकारी, प्रभा नांदणे प्रवेशिका, नूतन तायडे, योगेश काकड तसेच पात्र उमेदवारांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT