विदर्भ

अपहरण करून मुलीस विकण्याचा प्रयत्न फसला; महिलेस अटक

संतोष ताकपिरे

अमरावती : शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction of a minor girl) वाममार्गाने लावण्याच्या उद्देशाने विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. परंतु, पोलिसांच्या प्रयत्नाने त्याला आळा बसला. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरून एका ३१ वर्षीय महिलेविरुद्ध (31 year old woman arrested) अपहरणासह पिटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. (An-attempt-to-abduct-and-sell-the-girl-failed-in-Amravati)

शुक्रवारी अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता घरून निघून गेली होती. अल्पवयीन मुलीच्या संपर्कात असलेल्या युवकाने तिला एक मोबाईल सुद्धा घेऊन दिला होता. पित्याने मुलीच्या अपहरणाची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल केली. शनिवारी अल्पवयीन मुलगी आणि संशयित आरोपी महिलेसोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरताना दिसली. सदर महिलेसह अल्पवयीन मुलीला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली.

प्राथमिक चौकशीतून ज्या महिलेने मुलीच्या अपहरणाचा डाव रचला तीच मुलीला वाममार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेविरुद्ध अपहरण, पिटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या मुलीला बाहेर ठिकाणी नेऊन विकण्याची भीती होती, असे पोलिसांनी सांगितले. महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. असे गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

अल्पवयीन मुलीशी संबंधित घटनाक्रम असल्यामुळे त्यात वरिष्ठांचे मत घेऊन, मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पुढील कारवाई पोलिसांनी केली.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

(An-attempt-to-abduct-and-sell-the-girl-failed-in-Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

Manchar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलीप वळसे पाटील यांची मागणी

Kolhapur Gokul Politics: सतेज पाटलांसोबतच्या छुप्या मैत्रीचा आरोप करत महायुतीत मुश्रीफांना एकटं पाडण्याचा डाव?

Gill - Ishan Century: कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक! ईशान किशनने चोपलं, पण रोहितचं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर मंदिरात आता दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत मोफत दर्शन

SCROLL FOR NEXT