आंबोली : अथर्वच्या जुन्या आठवणी. 
विदर्भ

लहानगा अथर्व म्हणतो, पप्पा, मम्मीकडे कधी जाऊ...मुंबईत पोलिस असलेल्या आईच्या मुलाची व्यथा

राजेंद्र जाधव

आंबोली (चिमूर, जि. चंद्रपूर) : पाच वर्षांचा अर्थव वडिलांसोबत चिमूर तालुक्‍यातील चिंचाळा (शास्त्री) येथे राहतो. त्याची आई मुंबईत पोलिसात कार्यरत आहे. आता लॉकडाउनच्या काळात ती कायम बंदोबस्तात असते. सुट्यात मुंबईला जाऊ, असे अर्थवच्या वडिलांनी सांगितले होते. आता त्याची शाळा बंद आहे. सुट्याच सुरू आहेत, असे त्या चिमुकल्या जिवाला वाटत आहे. रोज तो वडिलांकडे एकच हट्ट करतो, "मम्मीकडे कधी जाऊ'. मात्र या प्रश्‍नांचे उत्तर तूर्तास कुणाकडेच नाही.

आई लोकांसाठी जिवाचे रान करीत आहे आणि मुलगा आईच्या भेटीसाठी व्याकूळ झाला आहे.
रूपाली अरविंद राऊत सध्या मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. तिचे पती आणि मुलगा अर्थव चिंचाळा (शास्त्री) येथे राहतात. रूपालीचे पती शेती करतात. मुलगा कॉन्व्हेंटला नर्सरीत आहे. फेब्रुवारी महिन्यात रूपाली अर्थवला भेटायला गावाला आली होती. परतीच्या प्रवासात बापलेकांनी तिला नागपूरला रेल्वेस्थानकावर सोडले. त्यावेळी रूपालीने सुट्या लागल्या की तू आणि पप्पा मुंबईला, ये असे सांगितले होते.

लहानग्या जिवाला कोरोनाबाबत सांगितले

लहानगा अथर्व सुट्या लागण्याची वाट बघत होता. इकडे कोरोनाचे वादळ आले आणि सर्वच बंद झाले. अथर्वची शाळाही टाळेबंद झाली. त्यामुळे त्याला शाळेला सुट्याच लागल्या, असे वाटायला लागले. तेव्हापासून तो आपल्या वडिलांच्या मागे मुंबईला मम्मीकडे जाण्याची जिद्द करीत आहे. वडिलांनी त्या लहानग्या जिवाला कोरोनाबाबत सांगितले. सर्व गाड्या बंद आहेत, याची खात्री पटवून दिली. सुरू होईल तेव्हा जाऊ, असे आश्‍वस्त केले.

मुंबईला सर्वाधिक कोरोना विषाणूची दहशत आहे. तिकडे लोकच घराबाहेर निघत नाही, अशी बातमीही त्याला दूरचित्रवाहिनीवर दाखविली. त्यामुळे अथर्वने केलेल्या उलट प्रश्‍नाने वडील निरुत्तर झाले.

मम्मी ड्यूटीवर कशी जाते?

लोक घराबाहेर निघत नाही, तर मम्मी ड्यूटीवर कशी जाते? असा भाबडा प्रश्‍न त्याने विचारला. वेळ मिळेल तेव्हा रूपाली भ्रमणध्वनीवरून संपर्क करते आणि लवकरच भेटू म्हणून रडणाऱ्या अर्थवला शांत करण्याचा प्रयत्न करते. आईची ही माया लहानग्या मुलाला समजणे कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT