Attack on police squad in Amravati 
विदर्भ

बापरे... चक्क पोलिस पथकावर हल्ला, काय झाला असावा प्रकार

शेखर चौधरी

मोर्शी (जि. अमरावती)  : पोळ्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चालत असलेल्या जुगारावर छापा टाकण्याकरिता गेलेल्या पोलिस पथकावर जुगाऱ्यांनी हल्ला केला. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने अमरावती येथे रवाना करण्यात आले. 

संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होणारा पोळा व पोळ्याची कर साजरी करताना परंपरेच्या नावाखाली सर्रास जुगार खेळला जातो. त्याप्रमाणे यंदाही मोर्शी शहरात एका ठिकाणी रात्री जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी जुगार बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना पाहताच तेथील काही लोकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.

त्यात एक होमगार्ड श्री. सौदागर व एक पोलिस शिपाई श्री. मानकर हे दोघे जण जखमी झाले. त्यातील श्री. सौदागर यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्री पोलिसांवर हल्ला करण्यात आल्यावर शहरातील जुगार बंद राहील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु दुसऱ्या दिवशी मोर्शी पोलिसांकडून मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या जुगारावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहेत. 
 

अडीच लाखांच्या मद्याची चोरी

अमरावती :  शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या कॅम्प परिसरातील केशव कॉलनीत विदेशी मद्यविक्रीचे दुकान फोडून 2 लाख 54 हजार 192 रुपयांचा माल चोरीस गेला. अभय आनंदकुमार भामोरे (वय 40, रा. पन्नालालनगर) असे मद्य व्यावसायिकाचे नाव आहे. मंगळवारी (ता. 18) पोळ्यांच्या दिवशी दुकान उघडण्याकरिता गेले असता, शटस तुटून चोरी झाल्याचे निदर्शनात आले. शुक्रवार (ता. 14) सायंकाळी दुकान बंद केले. त्यानंतरचे दोन दिवस संचारबंदीच्या काळात व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. बंद कालावधीत ही चोरी झाली. विविध कंपनीच्या बिअर, व्हिस्की, देशी, विदेशी दारूच्या बॉटल चोरीस गेल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात माल चोरून नेताना, वाहनाचा वापर झाल्याची शक्‍यता आहे. श्री. भामोरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवारपर्यंत त्यात कुणालाही अटक झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT