bad condition of roads due to sand smugglers in wardha  
विदर्भ

वाळू माफियांनी लावली रस्त्याची वाट; क्षमतेपेक्षा अधिक वाहतुकीचा परिणाम; तक्रारींकडे दुर्लक्ष 

शेख सत्तार

देवळी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील रस्ते सर्व वाळूसह गौण खनिजांच्या बेफाम वाहतुकीमुळे खराब झाले आहे. यामुळे नागरिकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी सर्वस्तरातून करण्यात आल्या पण त्याची दखल घेण्यात आली नाही.

तालुक्‍यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिपत्यात ग्रामीण मार्ग 83 आणि इतर जिल्हा मार्गाला जोडलेले 29 रस्ते असल्याचे अभियंता दौलतकार यांनी सांगितले. या रस्त्याच्या वापर गाव खेड्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत येण्याकरिता होतो. तालुक्‍याला वर्धा, यशोदा नदी व नाले मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे वाळू तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्‍यात रस्ते दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी आला नसल्याने सात वर्षापासून कोणतीच दुुरुस्ती झालेली नाही.

शिरपूर कोटेश्‍वर रस्ता वाळू वाहतुकीने खराब झाला. त्यामुळे भाविकांना दर्शनाकरिता व दशक्रिया कार्यक्रमाकरिता जाणे-येणे प्रवास करणे कठीण झाले आहे. देवळी-दिघी बोपापूर सरुळ हा रस्ता वर्धा कापसी राळेगाव शिरपूर-कोटेश्‍वर मुख्य रस्त्याला जोडणार आहे. पण यशोदा नदीवरील पूल वाहतुकीस योग्य नसल्याने बसवाहतूक बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांना शेतमाल बाजार पेठेत आणणे त्रासदायक झाले आहे.

देवळी-सोनेगाव हा रस्ता बिडकॉन कंपनीने मुरमाची वाहतूक करून खराब केला. दुरुस्तीचे आश्‍वासन दिले होते पण काहीच झाले नाही. हा रस्ता सोनेगाव-नागझरी-आगरगाव आणि पुलगाव जाण्याकरिता कमी अंतराचा आहे. देवळी-नांदोरा मुदगाव-आकोली पळसगाव आगरगाव फत्तेपूर या गावाला जाण्यायेण्याकरिता हा रस्ता महत्वाचा आहे. य

शोदा नदीवरील पूल आणि रस्ता जागोजागी खड्डे पडल्याने खराब झाला आहे. विजयगोपाल तांबा हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. शिरपूर, बोपापूर गणेशपूर-अंदोरी हा रस्ता शिरपूरवरून अंदोरी-आंजी जाण्याकरिता जवळचा रस्ता आहे. अंदोरीवरून राळेगावलासुध्दा जाता येते. त्यामुळे महत्त्वाचा रस्ता समजण्यात येतो. हा रस्तासुद्धा वाळू वाहतुकीने अतिशय खराब झाला आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी जि.प. कडून निधी नाही

रस्ते दुरुस्तीवर जिल्हा परिषदेने कोणताच निधी आतापर्यंत देण्यात आला नाही. या रस्त्याने दररोज शंभर ते 150 ट्रॅक्‍टर टिप्पर वाळूची वाहतूक करतात. जास्त प्रमाणात वाळू भरून वाहतूक करत असल्याने रस्ते रस्ते नाही पांदणरस्ते झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT