Bacchu Kadu Esakal
विदर्भ

Bacchu Kadu : बच्चू कडूंना मोठा धक्का! ‘प्रहार’च्या नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट!

सकाळ डिजिटल टीम

अकोला : माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्ष बळकट करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. प्रहारच्या अकोला जिल्‍ह्यातील पहिल्या जिल्हा परिषद सभापती ठरलेल्या स्मृती गावंडे यांचे पती निखील गावंडे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुका प्रमुख तुषार पाचकोर तसेच संजय बुध यांनी सहकाऱ्यांसह ता.१५ जून रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. (Latest Marathi News)

वंचितच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा जाहीर प्रवेश झाला. प्रहार जनशक्ती पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघावरच अधिक लक्ष केंद्रीत केले असताना प्रहारचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे, तालुका प्रमुख तुषार पाचकोर तसेच जिल्हा अध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय बुध, ग्रा. पं. लोतखेळ उपसरपंच विशाल नागरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केल्याने प्रहारला जिल्‍ह्यात मोठा धक्का बसला आहे. (Marathi Tajya Batmya)

पक्ष प्रवेश करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ओबीसी नेते ॲड. संतोष रहाटे, बंटी पाटील गावंडे, हिरा सरकटे व सचिन सरकटे आदी मान्यंवर उपस्थित होते.

‘वंचित’ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दिले होते सभापतीपद

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्मृती गावंडे यांना सभापतीपद देवून वंचितवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर प्रहार व वंचित यांच्यात अनेक आरोप-पत्यारोपाच्या फेरीही झडल्या होत्या. आता त्याच सभापतींचे पतीने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याने प्रहारला मोठा धक्का बसला आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघातच फुट

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे अकोला जिल्‍ह्यातील अकोट विधानसभा मतदारसघातून आमगानी निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. त्याच मतदारसंघात ‘प्रहार’मध्ये फुट पडल्याने पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT