Eknath Shinde : "ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही"; जाहिरात वादानंतर शिंदे-फडणवीस एकत्र!

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीनंतर भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात उपस्थित आहेत. दोघेही एकाच हेलिकॉप्टरने पालघर येथे कार्यक्रमाला गेले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. सर्वसमान्य लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमात आले आहेत, त्यांचे आभार मानतो, असे शिंदे म्हणाले.

आताचे शासन बदलले आहे. सरकारी कार्यालयात आता खेटे मारायला लागत नाहीत. आपल्या योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत, असा आमचा उपक्रम आहे. मी आणि उपमुख्यमंत्री आधीच्या सरकारमध्ये देखील होतो. आता ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहचले आहे.

Eknath Shinde
NEET UG Topper: पंक्चर काढणाऱ्या बापाची लेक होणार डॉक्टर, जाणून घ्या तिची Success Story

आमचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फरक आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.  डबल इंजिन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना ब्रेक लागले होते, आता सरकारने ४०० चांगले निर्णय घेतले, असे शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने फडणवीस काळातील अनेक योजना बंद केल्या. देवेंद्रजी पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता आपल सरकार आल्यानंतर योजना पून्हा सुरू केल्या. देवेंद्रजींच्या अनुभवाचा फायदा राज्याला झाला.  आमची युती सत्तेसाठी झाली नाही. एका वैचारिक भूमिकेतून ही युती झाली. मिठाचा खळा आम्ही बाजूला केला. फडणवीस आणि माझी दोस्ती १५ वर्षापासून आहे. जिवाभावाची आमची मैत्री आहे. हे बॉन्डिंग तुटणार नाही. फेविकॉल लावलेली आमची जोडी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Eknath Shinde
Maharashtra Politics: आमचा एकत्रित प्रवास हा 25 वर्षाचा...जाहिरात वादावर फडणवीसांनी सोडले मौन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com