Bribe esakal
विदर्भ

Bribe : लाचप्रकरणात तलाठ्यासह भाचाही अटकेत! दीड लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शेतकऱ्याच्या नावाने कुळ खरेदीनंतर त्याची फेरफार घेण्यासाठी तलाठ्याने ३ लाख रुपयांची डिमांड केली होती. त्यापैकी दीड लाख रुपयांचा लाचेचा टप्पा स्वीकारला. त्यात तलाठी असलेल्या मामासह रक्कम घेण्यासाठी पाठविलेला त्याचा भाचाही अडकला.

अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आशियाड चौक, विनायक मार्ट समोर, गुरुवारी (ता. ११) रात्री हा सापळा रचला होता. श्रावण विश्रामजी गाडे (वय ५७,रा. धानोरा कोकाटे, जि.अमरावती) असे तलाठ्याचे नाव असून, आनंद संजय इंगळे (वय २६, मिलिंद कॉलनी, अमरावती) यालाही त्यात अटक झाली.

तक्रारकर्ता व्यक्ती हे सनराईज अ‍ॅण्ड डेव्हलपर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अग्रीकेटर म्हणून काम पाहतात. धानोरा कोकाटे परिसरात भूमापन क्रमांक १५८ मधील तीन हेक्टर ३६ आर जमीन शरद भाऊराव डहाके व देविदास महादेव विखार यांच्यासोबत कंपनीने भाडेपट्टा पूर्व करार केला आहे.

त्या शेतीचे प्रकरण अमरावती तहसीलदार यांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या नावे कुळ खरेदी करून देण्यात आले असून, त्याचा फेरफार घेण्याकरिता धानोरा कोकाटे येथील तलाठी यांनी तक्रारकर्त्याला ३ लाख रुपयांची मागणी केली होती.

त्यासंदर्भात तक्रारकर्त्याने पैसे देण्यापूर्वी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तलाठी श्रावण गाडे यांनी फेरफार घेण्याकरिता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी लाचेची रक्कम घेण्यासाठी भाचा आनंद इंगळे याला पाठविले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने सापळा रचून आधी भाचा व नंतर तलाठी अशा दोघांना अटक केली. पोलिस निरीक्षक योगेशकुमार दंदे, अमोल कडू, विनोद कुंजाम, आशिष जांभोळे, शैलेश कडू, गोवर्धन नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT