Crime News : कुलरमध्ये पाणी टाकण्यावरून लग्नमंडपात तुंबळ हाणामारी; ५ जखमी

Crime news
Crime newsesakal

अमरावती : लग्नमंडपामध्ये कुलरमध्ये पाणी टाकण्यावरुन उद्भवलेला वाद वाढल्यामुळे लग्नमंडपात दोन गटात हाणामारी झाल्याने काही वेळेसाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत दोन्ही गटातील एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवनी सक्राजी गावात ही घटना घडली.

Crime news
Crime News : मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घालून केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर...

दोन्ही गटातील एकूण पाच जणांविरुद्ध वरुड पोलिसांनी गुन्हे दाखल केले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सागर दिलीप बनसोड (वय २७, रा. पवनी सक्राजी) हे गावातील अमोल रमेश वाघ, सचिदानंद नामदेव कोहळे असे तिघे एका लग्नसमारंभात गेले होते. (Latest Marathi News) |

तेथे विनय श्यामराव गाडगे (वय २०), वैभव श्यामराव गाडगे (वय २२) व नितीन आजनकर (वय २२, रा. वडाळ, वरुड) या तिघांचे वराकडील मंडळींसोबत भांडण सुरू असताना, सागर बनसोड व त्याचे दोन मित्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता, तिघाही संशयितांनी बनसोडसह त्यांच्या अन्य दोन मित्रांसोबत वाद घातला. भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून भाजी वाढण्याच्या स्टिलच्या बकेटने मारहाण केली. त्यात अमोल रमेश वाघ, सच्चिदानंद नामदेव कोहळे व सागर बनसोड असे तिघे जखमी झाले. (Breaking Marathi News)

Crime news
Sameer Wankhede : समीर वानखेडेंचे ग्रहमान फिरले! त्यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयचे छापे

बनसोड यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच घटनेत परस्परविरुद्ध बाजूने नितेश शरद आजनकर (वय २४) युवकाने तक्रारीत म्हटले की, लग्नसमारंभात कॅटरर्सचे काम करणाऱ्या मुलांसोबत कुलरमध्ये पाणी टाकण्याच्या कारणावरून वाद घालून संशयित सच्चिदानंद नामदेव कोहळे व शुभम ठाकरे यांनी वाढण्याच्या बकेटने मारहाण करून नीतेश आजनकरसह त्याचे साथीदारास जखमी केले. नीतेश यांचे तक्रारीवरून वरुड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com