Bride come on tractor at place of wedding in yavatmal  
विदर्भ

...अन् ट्रॅक्टर वर स्वार होऊन वधू पोहोचली मंडपात; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता उचललं पाऊल

शंकर जोगी

वडकी (जि. यवतमाळ)  : जय जवान जय किसान ही कृषी संस्कृती असणाऱ्या देशाच्या राजधानीमध्ये आज शेतकरी व देशाचे जवान समोरासमोर येण्याचा दुर्देवी प्रकार देशात निर्माण झाला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला एक संस्कार मानण्यात आले आहे.अशा वेळी विवाहाच्या मंगल संस्कारातून कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा  देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील नववधूने एक धाडसी निर्णय घेतला.कृषी संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या ट्रॅक्टर वर स्व|र होतं नववधू चक्क वर मंडपी दाखल झाली.

राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी असलेले पंढरीनाथ दुर्गे यांची कन्या कुमारी प्रणाली हीचा विवाह दिनांक १६ February रोजी चंद्रपूर येथील वर निकेश ज्ञानेश्वर झोटिंग चंद्रपूर या मुलाशी ठरला, या लग्नाची विशेषता म्हणजे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नववधू चक्क ट्रॅक्टर चालवत मंडप स्थळी पोहचली. 

आपण नेहमी पाहत असतो की वर व वरांकडील मंडळी ही वाजत गाजत वधु मंडपी येतात परंतु या सर्व गोष्टी ला फाटा देत प्रणाली हिने सामाजिक संदेश देत ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला शेतकऱ्याची कन्या म्हणुन अनोखा पाठिंबा दिला. सद्या राळेगाव शहरात या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT