coronavirus 
विदर्भ

विदर्भातही हातपाय पसरायला सुरुवात : करोनाची यवतमाळच्या दारावरही थाप

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : दिवसेंदिवस करोनाची दहशत वाढत चालली आहे. आतापर्यंत दूरवर असलेल्या करोनाने आता विदर्भात्ही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. करोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झालेल्या पुण्यातील प्रवाशांबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 9 जणांनी प्रवास केल्याचं उघडकीस आल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या सर्व 9 जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीन कुटुंबातील 10 जण फिरण्यासाठी दुबईला गेले होते ते सर्व तिथून 1 मार्चला ते परत आले. त्यातील एका तरुण व्यक्तीवर पुण्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे तर त्याच्या सोबत प्रवास करणारे इतर 9 जण सध्या यवतमाळ जिल्ह्यात आपापल्या घरी असून त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या सर्वांमुळे अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे.
नागरिकांनी स्वच्छता राखावी आणि योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी अनावश्‍यक प्रवास टाळावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असेही सांगण्यात येत आहे.

घरी निगरणीत
सध्या सर्वत्र कोरोनाने भीती निर्माण केली आहे. प्रत्येकजण दुसऱ्याकडे संशयाने बघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. अशातच बाहेर देशातून जिल्ह्यात आलेल्या तिघांवर संशयातून पाळत ठेवण्यात येत आहे. हे तिघेही त्यांच्या घरी असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
साऊथ कोरिया येथे शिक्षणासाठी असलेला युवक होळीकरिता वर्ध्यात आला. बाहेर देशातून आल्यामुळे त्याला त्याच्याच घरी निगरणीत ठेवण्यात आले आहे. इराणच्या मसद येथून हिंगणघाट आणि कारंजा येथे आलेल्या युवकांवरही सावधगिरी म्हणून लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नसून केवळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT