esakal | दारूच्या नशेत भाऊ चाकू घेऊन धावला आईच्या मागे, तेवढ्यात आलेल्या लहान भावाने केले हे...
sakal

बोलून बातमी शोधा

Big brother murdered by small brother in Nagpur

दारूच्या नशेत भाऊ चाकू घेऊन धावला आईच्या मागे, तेवढ्यात आलेल्या लहान भावाने केले हे...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर :  मोठ्या भावाला दारूचे व्यसन... रोज दारू पिऊन घरी यायचा... घरी आल्यानंतर दारूच्या नशेत आई व मुलाला मारहाण करायचा... यामुळे सर्वजण भयभीत राहायचे. तरीही घरच्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला... मात्र, तो समजण्याच्या स्थितीतच नव्हता... तो सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आई व मुलाला मारहाण करीत होता... होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी तो आईवार चाकू घेऊन धावला. यामुळे चिडलेल्या लहान भावाने त्याचा खून केला. ही घटना वाठोडा परिसरात घडली. विक्‍की गुरुदेवप्रसाद जैस्वाल (वय 26, रा. अबुमियानगर, भांडेवाडी) असे खून झालेला तर शुभम गुरुदेवप्रसाद जैस्वाल (वय 24) असे आरोपी भावाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्‍की हा कॅटरिंगचे काम करीत होता. नऊ महिन्यांपूर्वी तो पत्नीसह बुटीबोरी येथे राहायला गेला होता. मात्र, पत्नीशी सतत वाद होत असल्याने तो साडेचार वर्षांच्या मुलाला घेऊन पुन्हा नागपुरात राहायला आला होता. पत्नी मात्र तेथेच राहत होती. वृद्ध आई, मुलगा, लहाण भाऊ शुभम व त्याची पत्नी असा परिवार अबुमियानगरात राहात होता. शुभम हा आरामशीनवर काम करतो. 

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत; कोणत्या वादग्रस्त निर्णयामुळे नव्हे तर...

मोठा भाऊ विक्‍कीला दारूचे व्यसन असल्याने रोज दारू पिऊन घरी आल्यानंतर धिंगाणा घालत होता. आई आणि मुलाला मारहाण करीत होता. यामुळे घरचे चिडले होते. होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास विक्‍की दारू पिऊन घरी आला. त्याने आईशी वाद घालून मारहाण केली. तसेच तिच्यावर चाकू घेऊन धावला. 

तेवढ्यात लहान भाऊ शुभम हा मित्र अक्षय आणि अन्य दोघांसह घरी आला. आईच्या अंगावर चाकू घेऊन मारायला धावलेल्या विक्‍कीच्या हातातून शुभमने चाकू हिसकावून घेतला. त्याला अन्य दोन मित्रांनी पकडून ठेवले. आईवर चाकू काढल्याने चिडलेल्या शुभमने विक्‍कीच्या पोटात चाकू भोसकला. यात विक्‍कीच्या पोटातील आतड्याच बाहेर निघाल्या. काही क्षणातच विक्‍कीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून शुभम जैस्वालला अटक केली. 

पार्टीनंतर हत्याकांड

सोमवारी होळी असल्याने आधीच पार्टी करण्याचा बेत शुभमने आखला होता. यासाठी तो तीन मित्रांसह पार्टीसाठी बाहेर गेला होता. पार्टी केल्यानंतर तो तिन्ही मित्रांसह घरी परतला. घरीत येताच त्याला मोठा भाऊ आईच्या अंगावर चाकू घेऊन धातव असल्याचे दिसला. यामुळे चिडलेल्या शुभमने तीन मित्राच्या मदतीने मोठ्या भावाचा खून केला. रक्‍ताच्या नातेसंबंधाला छेद देणाऱ्या या घटनेमुळे होळी सणाला गालबोट लागला आहे.

जाणून घ्या - माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, नाही तर तुला जाळतो; त्याने दिली धमकी

तुम्ही जा, मी बघून घेतो

शुभमने दारूच्या नशेत आईचा जीव वाचविण्यासाठी भावाचा खून केला. मात्र, भावाचा जीव गेल्यानंतर काही मिनिटातच त्याला पश्‍चाताप झाला. "तुम्ही जा, मी बघून घेतो' अशी सूचना अन्य तीन आरोपींना दिली. त्यानंतर तो आईसमोर येऊन रडायला लागला. 

go to top