criminal got life imprisonment punishment for killing woman  
विदर्भ

मेहुणीच्या खुनातील आरोपीला आजीवन कारावास; मानेवर आणि डोक्‍यावर कोयत्याने केले होते वार

दीपक फुलबांधे

भंडारा ः मेहुणीच्या मानेवर व डोक्‍यावर कोयत्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सोमेश्‍वर कचरू दिघोरे (रा. उमरी, ता. पवनी) असे आरोपीचे नाव आहे.

३ फेब्रुवारी २०१६ रोजी तक्रारदार लीला राजकुमार डहारे (रा. तळोधी बाळापूर, जि. चंद्रपूर) हिने पवनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ती लग्नाच्या कार्यक्रमासाठी माहेरी आली होती. वडिलांच्या घराच्या मागे तिचा चुलतभाऊ विजय मनोहर दिघोरे पत्नी किरणसह राहत होता. तसेच दुसरा चुलतभाऊ आरोपी सोमेश्‍वर कचरू दिघोरे हा गावातच आबादी प्लॉटवर पत्नी बालीसह राहत होता. 

आरोपीची पत्नी बाली व आणि दुसऱ्या भावाची पत्नी किरण या दोघी बहिणी आहेत. आरोपी सोमेश्‍वर पत्नी बालीसोबत नेहमी भांडण करून तिला मारहाण करायचा. ही बाब बाली बहीण किरणला सांगायची. त्यामुळे सोमेश्‍वर किरणचा राग करीत होता. त्याने तिच्यासोबत भांडणही केले होते. अशातच सोमेश्‍वरची पत्नी बाली त्याच्या त्रासाला कंटाळून भुयार येथे नातेवाइकांकडे गेली होती. 

३ फेब्रुवारी २०१८ ला दुपारी लीला डहारे हीला किरणच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने जाऊन पाहिले असता आरोपी सोमेश्‍वर किरणला कोयत्याने मारत असल्याचे दिसले. किरणच्या मानेवर व डोक्‍यावर गंभीर मार लागल्याने तिचा नागपूर येथे रुग्णालयात ४ जून २०१८ ला मृत्यू झाला होता. पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल केले होते. न्यायालयाने मंगळवारी (ता.१६) पुराव्यांच्या आधारे आरोपी सोमेश्‍वरला आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तसेच कलम ४४९ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT