esakal | यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात पूजा अरुण राठोडचा गर्भपात केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंतागुंत अजूनच वाढली आहे. 

यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिस यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून अरुण राठोड नावाच्या व्यक्तीचा उल्लेख झाला होता. पूजाबद्दलचं संभाषण जगजाहीर आहे. मात्र याचबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात पूजा अरुण राठोडचा गर्भपात केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंतागुंत अजूनच वाढली आहे. 

यापेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे पूजाचा गर्भपात करणारा डॉक्टर त्यादिवशीपासून गायब आहे. या प्रकरणात राज्यातील मंत्र्यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे पूजाचं नाव न घेता किंवा तिची ओळख न देता तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - हायकोर्टाने व्यक्त केली शासनावर नाराजी; लोणार प्रकरणी सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश

व्हायरल झाल्या होत्या ऑडिओ क्लिप्स

या प्रकरणात पूजानं आत्महत्या केल्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यात दोन व्यक्तींमधील संभाषण ऐकायला मिळत आहे. ४ फेब्रुवारीला व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनुसार, ज्या मंत्र्यांचे नाव या प्रकरणात पुढे आले आहे. त्यांच्या एका सहकाऱ्यांने त्यांना सांगितले होते की, ‘ती मुलगी गर्भपात करण्यास तयार नाही आणि आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात येत आहेत.’ त्यावर मंत्री म्हणतात, ‘तिला समजावून सांग की जीवनात असे प्रसंग येत असतात. पण आत्महत्या त्यावरचा उपाय नाही.’ पण त्यानंतरही ती मुलगी ऐकत नाही, असे तो सहकारी सांगतो.   

तिला यवतमाळमध्ये घेऊन ये 

यानंतरच्या क्लिपमध्ये मंत्री आधीच पुणेच्या एका रिसॉर्टवर सहपरिवार गेलेल्या त्यांच्या एका मित्राला कॉल करतात आणि सांगतात की, तू तिला समजावून यवतमाळला घेऊन ये आणि ऐकत नसेल तर रातोरात उचलून आण, पण कसंही करून घेऊन ये. त्यानुसार तो मित्र तिला घेऊन यवतमाळला येतो. त्यानंतर ५ फेब्रुवारीला पूजा अरुण राठोडला यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल करण्यात येते.

पूजाचा केला गर्भपात 

५ फेब्रुवारीला जेव्हा दिला दाखल करून घेण्यात आले तेव्हा डॉ. श्रीकांत वऱ्हाडे कर्तव्यावर होते. त्याचवेळी दुसऱ्या एका डॉक्टरने डॉ. वऱ्हाडेंना सांगितले की, ही माझी केस आहे. तुम्ही यामध्ये लक्ष देऊ नका. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. पण हे सर्व करताना तिचे आधार कार्ड घेण्यात आले की नाही, हासुद्धा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मुलीच्या आवाजातील क्लिप व्हायरल 

तिचे आधार कार्ड कोणते देण्यात आले आणि केसपेपर तयार केले की नाही, याबाबतही उलटसूलट चर्चा आहेत. त्यानंतर ६ फेब्रुवारीला ‘मला भूक लागली (मुलीचा आवाज) आणि मंचुरीयन खाऊन घे (पुरूषाचा आवाज), असे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला तिला पुणे येथे नेण्यात आले. त्यानंतर ८ फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. अशाप्रकारे सर्व घटनाक्रम झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा - अमरावतीच्या काठीला ४५ राज्यांत मागणी; राष्ट्रीय...

मात्र आता प्रकरणात मोठा टिट्वीस्ट आला आहे. पूजेची ओळख लपवून तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र गर्भपात करणारा डॉक्टर नक्की कुठे आहे? या प्रकरणात खरंच कथित मंत्र्यांचा हात आहे का? हे प्रश्न काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. 


संपादन - अथर्व महांकाळ 

loading image