Eleventh baby dies in Bhandara hospital fire incident 
विदर्भ

भंडारा अग्निकांड : श्‍वसनाचा त्रास आणि डोळ्यातून सतत पाणी गळत असल्याने बाळाचा मृत्यू; ११ वा बळी

दीपक फुलबांधे

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नऊ जानेवारीच्या पहाटे झालेल्या अग्निकांडातून बचावलेल्या नवजात बाळाचा शुक्रवारी (ता. पाच) प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. अग्निकांडाच्या घटनेपासून त्याला श्‍वसनाच्या आजाराचा त्रास होता, अशी माहिती आहे.

भंडारा तालुक्‍यातील कोका येथील सानू मनोज मारबते यांचे हे बाळ तीन महिने सात दिवसांचे होते. अग्निकांडातून मुलाचा जीव वाचल्याचा आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर फारकाळ टिकू शकला नाही. या बालकावर दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये उपचार सुरू होता. आठ जानेवारीच्या मध्यरात्री शिशू केअर युनिटला भीषण आग लागली.

यात दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला तर सात बाळांना सुखरूप बाहेर काढून प्राण वाचविण्यात आले. त्यापैकीच हा एक होता. सातपैकी सहा बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले. परंतु, मारबते दाम्पत्याच्या या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने भंडारा येथील आयुष शिशू केअरमध्ये उपचार सुरू होते. त्याची प्रकृती खालावल्याने १६ जानेवारीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते.

तेथेही प्रकृती अस्वस्थतेमुळे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, जळीतकांडाच्या घटनेपासून त्याला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्याच्या डोळ्यातून सतत पाणी गळत होते. त्यामुळे तो नीट झोपतही नव्हता. याबाबत पालकांनी डॉक्‍टरांकडे तक्रार केली होती.

बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगून नागपूर येथील डॉक्‍टरांनी त्यांना १ फेब्रुवारीला घरी पाठविले. मात्र, घरी परत आल्यानंतरही वरील लक्षणे कायम होती. शुक्रवारी दुपारी तो निपचित पडल्याने कोका उपकेंद्राच्या माध्यमातून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT