esakal | सकाळच्या वेळी शेतातून येत होता खळखळ आवाज; जाऊन बघताच तळपायाची आग गेली मस्तकात 
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळी शेतात जाताच सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होते. गहू आणि मिरचीचे पीक पाण्यात बुडालेले होते. कशीबशी रब्बी हंगामात परिस्थिती सावरेल असेच जणू वाटले होते. मात्र कालव्याचे पाणी शेतात शिरल्याचे पाहून तळ पायातली आग डोक्यात सरकली.

सकाळी शेतात जाताच सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होते. गहू आणि मिरचीचे पीक पाण्यात बुडालेले होते. कशीबशी रब्बी हंगामात परिस्थिती सावरेल असेच जणू वाटले होते. मात्र कालव्याचे पाणी शेतात शिरल्याचे पाहून तळ पायातली आग डोक्यात सरकली.

सकाळच्या वेळी शेतातून येत होता खळखळ आवाज; जाऊन बघताच तळपायाची आग गेली मस्तकात 

sakal_logo
By
संदीप गौरखेडे

कोदामेंढी (मौदा) : बरेचशे शेतकरी बँकेचे कर्ज काढून शेती पिकवितात. खरीप हंगामात बेमोसमी पाऊस, टोळधाड आणि तुडतुडा यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाचे फारशे उत्पादन झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. रब्बी हंगामात कशीबशी परिस्थिती सुधारेल या आशेवर शेतकरी होता. मात्र कंत्राटदार आणि पाटबंधारे विभागाच्या समन्वयाअभावी तसेच चुकीमुळे 'सी' मायनर फुटल्याने नांदगाव शिवारातील शेतकऱ्यांचे गहू आणि मिरची पिकाचे नुकसान झाले.

सकाळी शेतात जाताच सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होते. गहू आणि मिरचीचे पीक पाण्यात बुडालेले होते. कशीबशी रब्बी हंगामात परिस्थिती सावरेल असेच जणू वाटले होते. मात्र कालव्याचे पाणी शेतात शिरल्याचे पाहून तळ पायातली आग डोक्यात सरकली. कालवा फुटल्याने पाणी पिकात  शिरले आणि मोठे नुकसान झाल्याने  वैतागलेला शेतकरी योगेश काठोके हंबरड्या स्वरात सांगत होता. 

 हेही वाचा - दोन पोलिस कर्मचारी निलंबित; वाळूचे ट्रक सोडण्यासाठी पैशांची मागणी करणे भोवले
 
दोन वर्षांपासून पेंचचा डाव्या कालव्यांतर्गत येणाऱ्या 'सी' मायनरचे बांधकाम सुरु आहे. कोरोना काळात बांधकाम रखडलेले होते. आता सी मायनरचे मातीकाम आणि कचरा साफसफाई इतकेच काम झाले. कंत्राटदाराने मायनरमधील कचरा कापून तो तिथेच ठेवला. रब्बी पिकाकरिता पंधरा दिवसापासून पेंच कालव्याला पाणी सोडण्यात आले. टेल वरील शेतकऱ्यांना पाण्याची गरज असल्याने त्यांनी संबंधित विभागाकडे तशी मागणी केली. त्यामुळे पाण्याचा गेज वाढविण्यात आला. मात्र मायनरमध्ये कापून ठेवलेला कचरा पाण्याच्या प्रवाहाने फालमध्ये लटकला आणि 'सी' मायनर फुटला. त्यामुळे नांदगाव शिवारातील 
५. १६ हेक्टर आर शेतपिकाचे नुकसान झाले. 

याबाबतची सूचना महसूल विभाग आणि पाटबंधारे विभागाला देण्यात आली. अरोलीचे तलाठी प्रणय डंभारे आणि पेंच विभागाचे अभियंता अक्षय वाकरेकर यांनी घटना ठिकाणी येऊन पाहणी केली. बातमी लिहीपर्यंत महसूल विभागामार्फत पंचनामा झाला नव्हता. जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, उपसरपंच कैलास महादुले, पाणी वापर संस्थेचे  सुरेश सज्जा यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. 

कंत्राटदार आणि पाटबंधारे विभागाचा  हलगर्जीपणा  

'सी' मायनरची दुरुस्तीचे बांधकाम सुरु असून त्यामधील कचरा मायनरमध्ये ठेवण्यात आला. टेल मधील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केल्याने पाण्याचा गेज वाढविण्यात आला. मात्र मायनरला पाणी सोडण्याआधी किंवा गेज वाढविण्यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करणे गरजेचे होते. कंत्राटदार आणि पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी आपसात समन्व ठेवला नाही. आणि पाण्याची पातळी वाढविण्यात आली त्यामुळे मायनरमध्ये कापून ठेवलेला कचरा फालमध्ये अडकून कालवा फुटला. यात दोघांच्या हलगर्जीपणामुळे  शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. कापून ठेवलेला कचरा वेळीच उचलला  किंवा पेटविला असता तर मायनर फुटला नासता. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणावर कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. 

नक्की वाचा - ‘नाही कोणाशी वादावादी, आता आम्ही राष्ट्रवादी’;...

खरडा येथील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी होती त्यामुळे पाण्याचा गेज वाढविण्यात आला. मायनरमध्ये कचरा असल्याने तो वाहून फालमध्ये लटकला म्हणून मायनर फुटला. मात्र ज्या शेतकऱ्यांचे पाणी होते ते बंद करीत नाहीत आणि सूचना देत नाही त्यामुळे असे प्रकार घडतात. 
अक्षय वाकरेकर,
कनिष्ठ अभियंता काचूरवाही शाखा 


 संपादन - अथर्व महांकाळ 

go to top