Scrab-Paper sakal
विदर्भ

वाया जाणाऱ्या कागदापासून लिफाफे अन् कॅरीबॅग

विविध वस्तू तयार करून ते अत्यल्प दरात विक्रीसाठी उपलब्ध होणार

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : शासकीय कामकाज करतेवेळी कागदपत्रांचा वापर करीत असताना बराच कागद वाया जातो. त्याचा कुठलाही वापर होत नसल्याने तो जाळण्यात जातो. यामुळे हा कागद मगन संग्रहालयाला देण्यात निर्णय जिल्हाधिकरी कार्यालयाने घेतला आहे. यातून ते विविध वस्तू तयार करून ते अत्यल्प दरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

कागदाची निर्मिती ही वृक्षापासून केली जाते. अनावश्यक व्यर्थ जाणाऱ्या कागदामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यासाठी मगनसंग्रहालय समितीच्या वतीने निरुपयोगी कागदावर प्रक्रिया करून त्यापासून कार्यालयास उपयोगी वस्तू बनविण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांनी दैनंदिन वापरात खराब होणारा कागद मगनसंग्रहलयास दयावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिल्या आहेत.

निरुपयोगी कागदापासून मगनसंग्रहालय समितीच्या वतीने फाईल्स, राईटिंग पॅड, लिफाफे, कॅरी बॅग, डस्टबिन, टिकोस्कर, सॉप्ट बोर्ड, नोटीस बोर्ड इत्यादी वस्तू बनविण्यात येत आहे. शासकीय कार्यालयास विक्रीस उपलब्ध असणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांनी निरुपयोगी कागद मगनसंग्रहालयास दिल्यास वस्तू खरेदीवर सुटसुद्धा मिळणार आहे. यासाठी शासकीय कार्यालयानी मगनसंग्रहालयातील सुषमा सोनटक्के यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

अंहिसा दिवसापासून पर्यावरण रक्षण

२ ऑक्टोंबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिन अंहिसा दिवस म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. पर्यावरण पूरक अशा उपक्रमात शासनाच्या सर्व विभागांनी सहभागी होऊन पर्यावणाचे संर्वधनाच्या दिशेने पाऊल उचलावे तसेच शासकीय खरेदीच्या रक्कमेत बचत करून शासनाच्या निधीचीसुद्धा बचत करण्यात जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

Eknath Shinde Vishakha Raut : ‘पद वाचवा, २० नगरसेवक फोडते’; विशाखा राऊत यांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव? समाधान सरवणकरांचा धक्कादायक दावा

Pune Railway: पुणे-हडपसर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका सज्ज; वाहतुकीतील क्रॉसिंगचा अडथळा दूर; प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

SCROLL FOR NEXT