Corona Update: राज्यातील कोविड परिस्थिती निवळतेय

critical situation bed oxygen icu not available for covid patients
critical situation bed oxygen icu not available for covid patients

मुंबई : देशासह जगभरात सध्या कोरोनाचं संकट आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली असून कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाहीये. दुसऱ्या लाटेमध्ये सर्वांत जास्त नुकसान हे महाराष्ट्र राज्याचं झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 2432 नवीन रुग्ण सापडले. रविवारी 3206 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,41,762 झाली आहे. तर 2895 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,62,248 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.26 % एवढे झाले आहे.

critical situation bed oxygen icu not available for covid patients
PM मोदी शेतकऱ्यांचा सन्मान करतात, चर्चेस तयार: भाजप

आज राज्यात 32 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 1,38,902 इतका झाला आहे. राज्यात राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 37,043 इतकी आहे. नागपूर,अकोला,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 7,नाशिक 13,पुणे 6,कोल्हापूर 4,लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,57,144 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,517 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com