विदर्भ

वर्ध्यात लसीकरणावरून लोकप्रतिनिधींमध्ये बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : लसीकरण केंद्राच्या (Vaccination center) जागेच्या वादावरून जिल्हा परिषद सदस्य (ZP member), ग्रामपंचायत सदस्यात बाचाबाची झाली. शिवीगाळ करत दोघांत चांगलीच बाचाबाची झाली. जिल्हा परिषदेच्या (wardha ZP) आवारातच शुक्रवार (ता. चार) रोजी हा राजकीय आखाडा रंगला. या घटनेवरून जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. तेथे आपसी समेट घडल्याचे सांगण्यात येत आहे. (extreme debate over vaccination in leaders in wardha )

कोरोना संसर्गापासून बचाव करण्याकरिता सध्या सर्वत्र लसीकरण सुरू आहे. लोकप्रतिनिधीही लसीकरण झपाट्याने व्हावे, याकरीता प्रयत्न करीत आहेत. लगतच्या एका ग्रामपंचायतीमध्ये लसीकरणाचे नियोजन होते. सुरुवातीला एका शाळेत लसीकरण सुरू होते. परंतु, काही अडचणींमुळे लसीकरण थांबले. त्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली. शाळेत असलेले लसीकरण दुसऱ्या ठिकाणी सुरू करण्याची तयारी करण्यात आली. मात्र जुन्याच ठिकाणी लसीकरण करावे, यावरून वाद सुरू झाला.

हा वाद अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्याकरिता पदाधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदेत आले. जिल्हा परिषदेतील अधिककऱ्यांपुढे याबाबत चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेत पुढील नियोजन करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी दालनातून बाहेर आले. दरम्यान, येथे आलेल्या जिल्हा परिषद सदस्याने ग्रामपंचायत सदस्याला बघताच शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येते. यातून सुरू झालेला शिवीगाळीचा वाद पुढे सरकत बाचाबाची होण्यापर्यंत पोहोचला.

दरम्यान, एका जणाने मध्ये जावून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील मोकळ्या जागेत झालेल्या वादाने जिल्हा परिषदेत एकच धावपळ झाली. एकमेकांना शिवीगाळ करीत आरडाओरड सुरू झाल्याने परिसरात असणाऱ्यांचे लक्ष याकडे वेधल्या गेले. प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांना पाचारण केल्या गेले. पोलिसांनी दोघांनाही जिल्हा परिषदेच्या आवाराच्या बाहेर नेले. प्रकरण ठाण्यात पोहोचल्यानंतर आपसी समेट घडली. पण, या बाचाबाचीची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.

लोकांच्या अडचणी मात्र कायम

लसीकरणावरून श्रेयवादाचे प्रकार घडताना दिसत आहेत. त्यात जनतेला मात्र हकनाक त्रास सहन करावा लागतो. यामुळे लोकांच्या अडचणींचे निराकरण कोण करणार, हा प्रश्नच आहे.

(extreme debate over vaccination in leaders in wardha )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT