esakal | डॉक्टरांशी ऑनलाइन कन्सल्ट करताना 'या' गोष्टी नक्की ठेवा लक्षात; अन्यथा येऊ शकते समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

Online Doctor consultation

डॉक्टरांशी ऑनलाइन कन्सल्ट करताना 'या' गोष्टी नक्की ठेवा लक्षात

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : आजचा काळात टेक्नॉलॉजी (Technology era) इतकी प्रगत झाली की आपल्याला प्रकृतीसंबंधी काही समस्या असल्यास प्रत्यक्ष डॉक्टरकडे (Doctor consultation) जाण्याची गरज पडत नाही. स्मार्टफोन (Latest Smartphones) आणि मेसेजिंग अप्लिकेशन्समुळे हे अगदी सोपं झालं आहे. इतकंच नाही तर इंटरनेटच्या या जगात असे काही अप्लिकेशन्स आणि वेबसाईट्स (Online Doctor consultation) आहेत ज्यामध्ये आपण प्रत्यक्ष डॉक्टरांना बघू शकतो आणि ते ही आपल्याला बघू शकतात. आपण आपल्या समस्या त्यांना सांगू शकतो आणि समाधान मिळवू शकतो. मात्र हे सगळं करत असताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसंच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचीही गरज आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये मदत करतील. (know some tips before online consultation with doctors)

हेही वाचा: महाराष्ट्र अजून अनलॉक नाही अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील

तुमच्या प्रकृती संबंधी समस्यांची यादी तयार करा

अनेकदा आपण डॉक्टरकडे जातो किंवा ऑनलाइन कन्सल्ट करतो. यामध्ये आपण डॉक्टरांना समस्या सांगतो. मात्र काहीतरी महत्वाचं सांगायला विसरतो. असं अनेकांसोबत होतं. त्यामुळे ऑनलाइन डॉक्टरांशी बोलण्याच्या आधी तुमच्या समस्यांची यादी तयार करा. तुमच्या मेडिकल हिस्ट्रीबाबत सविस्तर डॉक्टरांना सांगा. त्यासाठी पॉइंटर फॉरमॅटमध्ये सर्व नोट डाउन करून ठेवा. तसंच रोजच्या लाईफस्टाईलबाबत डॉक्टरांना माहिती द्या.

online consultation with doctors

online consultation with doctors

डायबिटीज, बीपी लेव्हल नोट करून ठेवा

ऑनलाइन कन्सल्टेशनच्या आधी तुम्हाला असलेल्या शारीरिक व्याधींची लेव्हल नोटडाउन करून ठेवा. डायबीटीज, ब्लड प्रेशर, वजन, पल्स रेट, हार्ट रेट, उंची, शरीराचं तापमान यांसारख्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि नोटडाउन करून ठेवा.

online consultation with doctors

online consultation with doctors

गरजेच्या मेडिकल टेस्ट करून घ्या

जर तुम्ही डॉक्टरांना दुसऱ्यांदा भेटत असाल तर त्यांनी गेल्यावेळी सांगितलेल्या मेडिकल टेस्ट नक्की करून घ्या. ऑनलाइन कन्सल्टेशनमध्ये डॉक्टर तुम्हाला प्रत्यक्ष तपासू शकत नाहीत. त्यामुळे या टेस्टचे रिपोर्ट्स त्यांना नक्की कामी येतील आणि तुमच्या समस्यांचं निदान होऊ शकेल.

online consultation with doctors

online consultation with doctors

रिपोर्ट्स आणि हिस्ट्री आधीच अपलोड करा

ऑनलाइन कन्सल्टेशनच्या आधीच तुम्ही वापरत असलेल्या अप्लिकेशनवर किंवा वेबसाईटवर तुमचे मेडिकल रिपोर्ट्स किंवा मेडिकल हिस्ट्री अपलोड करून ठेवा. ज्यामुळे डॉक्टरांनी मागितल्यास तुमच्याकडे योग्य तो रेकॉर्ड राहील.

online consultation with doctors

online consultation with doctors

डॉक्टरांच्या स्वाक्षरीचं ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन मागून घ्या

डॉक्टरांशी बोलून झाल्यानंतर डॉक्टरांची स्वाक्षरी असलेलं ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन मागून घ्या. ज्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. या प्रिस्क्रिप्शनचा वापर करून तुम्ही ऑनलाइन औषधं मागवू शकता.

online consultation with doctors

online consultation with doctors

हेही वाचा: 2050 साली नक्की कसं असेल जग? जाणून घ्या

पेमेंट करताना सावधानता बाळगा

ऑनलाइन डॉक्टरांशी कन्सल्ट करताना विश्वासू अप्लिकेशनवरूनच डॉक्टरांना संपर्क साधा. शक्य असल्यास तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांकडूनच मार्गदर्शन घ्या. तसंच पेमेंट करताना विश्वासू सैतवरूनच पेमेंट करा. अनोळखी नंबरवरून फोन आल्यास OTP देऊ नका. पेमेंट करताना सावधानता बाळगा.

(know some tips before online consultation with doctors)