Tur Bhav  
विदर्भ

Farmer : शेतकऱ्यांना दिलासा! तुरीला १२ हजारांवर भाव; आणखी दर वधारण्याचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

अकोला : आठवडाभरात तुरीच्या दरात हळूहळू वाढ होऊन प्रतिक्विंटल १२ हजारावर भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे. पुढे अजूनही भाववाढीची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्याने तूर उत्पादकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

यावर्षी तुरीचे उत्पादन काही प्रमाणात घसरल्याचे चित्र आहे. मागणी अधिक असल्याने व आवक कमी असल्याने यंदा बाजारात तुरीला चांगले भाव मिळतील अशी तूर उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

केंद्र सरकारने २०२२-२३ करीता जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार ३०० रुपयांची वाढ देत तुरीला प्रतिक्विंटल ६६०० रुपये दर जाहीर केला. मात्र, आजपर्यंत एकाही वर्षी शासनाने शेतकऱ्यांच्या ५० टक्के सुद्धा तुरीची खरेदी केलेली नाही. शिवाय खते, बियाणे, मजुरी, एकंदरीतच उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल आठ ते दहा हजार रुपये भावाची अपेक्षा होती.

गेल्या हंगामात तुरीचा पेराही वाढला होता. मात्र, वातावरणातील बदलाचा परिणाम होऊन अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. परिणामी मागणी अधिक व आवक कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा सुरुवातीपासूनच सहा हजाराहून अधिक दर तुरीला मिळाले.

हळूहळू त्यामध्ये वाढ होत जाऊन, एप्रिलमध्ये ८८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मे मध्ये मात्र ३०० ते ४०० रुपयांनी भाव वधारले असून, शुक्रवारी (ता.२९) अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तुरीच्या भावात अजूनही वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्याने तुरीला अच्छे दिन आल्याची परिस्थिती आहे.

सरासरी ८२०० रुपये भाव

गत तीन ते चार आठवड्यात तुरीचे भाव वधारले असून, मे च्या सुरुवातीपासूनच कमाल ९२०० रुपयांपर्यंत भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे. त्यामध्ये कमाल ६४५० रुपये भाव मिळाला असून, सरासरी ८२०० रुपये प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांच्या तुरीला प्राप्त होत आहे.

अकोला बाजार समितीत आठवड्याभरातील तुरीचा भाव

तारीख भाव (प्रती क्विंटल)

२ मे ६००० ते ९०००

३ मे ५००० ते ९०००

४ मे ७२०० ते ९१००

६ मे ७००० ते ९२५५

८ मे ६२०० ते ८९९५

९ मे ६६०५ ते ८८०५

१० मे ६००० ते ९२५०

११ मे ६४५० ते ९१००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT