abs 
विदर्भ

अंत्यसंस्कारासाठी गेले मोक्षधाममध्ये अन् प्रेतासमोरच सुरु झाली तुंबळ हाणामारी; पूर्ववैमनस्यातून काढला वचपा

सकाळ डिजिटल टीम

वणी (जि. यवतमाळ) : सतिघाट येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक दोन गटात लाठ्या-काठ्या व दगडफेक करून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.

शिवम बिसमोरे, रितीक बिसमोरे, अनिकेत मोगरे, अंकुश मोगरे, अभिषेक ताराचंद, रोहित पांडे, प्रितम ठावरी, रितेश तोमस्कर, मारोती पेडावार, आकाश दारुंडे, चंदू बिसमोरे (सर्व रा. सेवानगर), स्वप्निल राऊत, चेतन राऊत, ईश्वर देठे, निलेश पाटील, बबलू चुराणकर (सर्व रा. रंगनाथ नगर) असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. 

रंगनाथ नगर येथे वास्तव्यास असलेली 26 वर्ष वयाच्या महिलेचा 28 मार्चला आजारपणात मृत्यू झाला. अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होते. अंत्यविधी सुरू असताना सेवानगर व अंत्यविधीत सहभागी झालेल्या रंगनाथ नगर येथील युवकांमध्ये जुन्या वादातून परत वाद चिघळला व दोन्ही गट आमने-सामने आले. एकमेकांवर लाठ्या-काठ्या व दगड धोंड्यांनी हल्ले चढविण्यात आले. यामध्ये मोक्षधामातील मजूर कैलास नवघरे (रा. रामपूरा वॉर्ड) हा जख्मी झाला.

मोक्षधामात अचानक उसळलेल्या राड्यामुळे अंत्यसंस्कारात आलेल्यांची चांगलीच धावपळ झाली. या बाबत पोलिसांना सूचित करण्यात आले. घटनेचे गांभीर्य बघता ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलिस कुमक पाठवून नियंत्रण मिळवीत आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मजूर कैलास नवघरे यांच्या तक्रारीवरून 16 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT