Husband killed with the help of friend, body thrown into the dam 
विदर्भ

साथीदारांच्या मदतीने पतीला संपविले, धरणात फेकला मृतदेह

कैलास जगताप

पुसद (जि. यवतमाळ)  : धारदार शस्त्राने पोटावर व छातीवर वार असलेला मृतदेह पूस धरणातील पात्रात आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. प्रियकरासह साथीदारांच्या मदतीने पतीला संपविल्याचे तपासात समोर आले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी (ता.21 ) सकाळच्या दरम्यान पूस धरणाच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता मृतकाच्या अंगावर तीक्ष्ण वार दिसून आले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले होते. मृतकाची ओळख पटवणे व आरोपींचा छडा लावणे अशी दुहेरी जबाबदारी पोलिसांवर होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन यासाठी पथक नेमले. या पथकाला घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृतक हा तालुक्‍यातील घाटोडी येथील रहिवासी असून, त्याचे नाव गोविंद प्रल्हाद बळी असल्याचे समजले. अधिक तपास पोलिसांनी केला असता सदर खून हा मृतकाची पहिली पत्नी पूजा, तिचा प्रियकर चेतन कैलास डंगोरिया व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याचे तपासात आढळून आले.

आरोपींच्या साथीदारांमध्ये सचिन हराळ, राजेश पवार, शेख शाकीर शेख रउफ व महेश उर्फ रामबहादूर रावल (सर्व रा. शिवाजी वार्ड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय चोबे करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलिस कर्मचारी मुन्ना आडे, गोपालवास्टर आदींनी केली.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT