मन सुन्न! चुली पेटल्याच नाहीत; मुलांच्या बाबतीत घडलेली हृदयद्रावक घटना बघून हळहळले अख्खे गाव

सायराबानो अहमद 
Wednesday, 23 September 2020

दरम्यान मंडळ अधिकारी देविदास उगले, नरेश सावंत, तलाठी विजय गाते, बाबा ठाकूर यांच्यासह गावातील नागरिकांनी बचावकार्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले होते. तसेच सदर घटनेची माहिती तत्काळ मंगरूळ दस्तगीर पोलिसांना देण्यात आली होती. 

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : एकीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळित झाले असताना दुसरीकडे गावानजीकच्या असलेल्या जलयुक्त शिवाराच्या नाल्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना  संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास नजीकच्या वाठोडा (बु.) येथे घडली. या घटनेमुळे वाठोडा गावात शोककळा पसरली असून चुलीच पेटल्या नाही.

तालुक्‍यातील वाठोडा येथील तीन ते चार मुले गावानजीकच्या जलयुक्त शिवारच्या नाल्यात पोहत होती. दरम्यान नाल्यात मोठा पाण्याचा लोंढा वाहत आला. त्यामुळे नाल्यात पाण्याची पातळी वाढली. यामुळे दोन मुले बुडाली. सदर घटना घडताच इतर मुलांनी गावाकडे ओरडत धूम ठोकली.

अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

घटनेचे वृत्त कळताच लगेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मुलांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान योगेश सतीश सलामे (वय 14) याचा मृतदेह नाल्यातून सोमवारी (ता.21) बाहेर काढण्यात आला, तर दुसरा मुलगा यश गजानन मेश्राम (वय 15) याचा मृतदेह मंगळवारला (ता. 22) आढळून आला.

दरम्यान मंडळ अधिकारी देविदास उगले, नरेश सावंत, तलाठी विजय गाते, बाबा ठाकूर यांच्यासह गावातील नागरिकांनी बचावकार्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले होते. तसेच सदर घटनेची माहिती तत्काळ मंगरूळ दस्तगीर पोलिसांना देण्यात आली होती. 

ठाणेदार श्‍याम वानखडे यांच्यासह पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली होते. दरम्यान दोन्ही मृत मुलांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात मंगळवारला (ता.22) करण्यात आली. वाठोडा येथील स्मशानभूमीत योगेश सलामेवर अंत्यसंस्कार करण्यात आले,

कडकनाथ कोंबडी खाल्ली का? होमिओपॅथी आणि मानसिक विकारासाठी होतोय वापर!

 तर यश मेश्राम याचा मृतदेह त्याच्या मूळगावी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्‍यात नेण्यात आला व तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश सलामे हा आठव्या वर्गात तर यश मेश्राम हा दहाव्या वर्गात कावली येथील लाभचंद मुलचंद राठी विद्या मंदिरात शिकत होता. सदर घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून दोन्ही मुलांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadness all over the village as two boys are no more due to drowning