police house in washim.jpeg 
विदर्भ

विदारक : दिवसा रस्त्यावर तर रात्री ही लढाई; ‘कोरोना फायटर्स’चे छतही...

राजदत्त पाठक

वाशीम : सकाळ सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तर कधी रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत रस्त्यावर कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी ‘कोरोना फायटर्स’ ठरले. मात्र, दिवसभर उन्हात आडमार्गावर कर्तव्य बजावल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी घर गाठावे तर घरातही पाणीगळते तर कधी सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वच अस्ताव्यस्त होते. घोटभर पाण्यासाठी कधी जीव लाहीलाही होतो. हे विदारक चित्र वाशीममधील जुन्या पोलिस वसाहतीत जागोजागी दिसते.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन महत्वाची भुमिका बजावत आहेत. आपल्या मुलाबाळांसह कुटुंबाकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस परिश्रमपूर्वक पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. असे असताना घरावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या या पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मात्र, त्यांच्याच वसाहतीमध्ये पुरेसे पिण्याचे शुद्ध पाणी, अस्वच्छता, खड्डे पडलेले रस्ते, फुटलेल्या नाल्या, पावसाळ्यात गळणारी छपरे अशा एक ना अनेक समस्यांशी झगडावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

येथील शहर पोलिस ठाण्याअंतर्गत जवळपास 70 ते 80 वर्षापूर्वी पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था म्हणून बाजूलाच पोलिस वसाहत निर्माण करण्यात आली. या वसाहतीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची 70 ते 72 कुटुंब राहत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या वसाहतीची व्यवस्थितपणे देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे या वतीहतीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या या वसाहतीमध्ये दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होतो.

अनेक वेळा अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच या वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचे पाइप फुटल्यामुळे त्यातील घाण पाणी रस्त्यावर येते. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. रस्त्याला खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणेसुद्धा कठीण झाले आहे. घरावरील छत फुटल्याने पावसाळ्यात घरात पाणी साचते. अशा अनेक समस्यांचा सामना करीत पोलिस कर्मचाऱ्यांना दररोज आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. पोलिस दादांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार होण्याची गरज आहे. 

महामारीच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य उत्तमप्रकारे बजावले, आपल्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस रस्त्यावर उतरून नागरिकांच्या जिवाची रक्षा केली याबाबत अनेक सामाजिक संस्था, राजकारणी त्यांचे भरभरून कौतुक करीत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कारही होत आहे. मात्र, हे करीत असताना पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच नगर पालिका प्रशासनाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, तोच त्यांचा योग्य सत्कार असेल, अशी प्रतिक्रिया अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

नुसतीच उपाधी समस्येकडे दुर्लक्ष
संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर घातला असताना वाशीम जिल्ह्यामध्ये मात्र, कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आहे. जिल्हा प्रशासनाची दक्षता त्याचबरोबर जिल्हा पोलिस दलाने घेतलेली मेहनत याला कारणीभूत आहे. समाजमाध्यमांवर ‘कोरोना फायटर्स’ म्हणून पोलिसांना गौरविले जाते. ज्या नागरिकांना समस्या आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी फोटोपुरतेका होईना लोकप्रतिनिधी जागतात. मात्र पोलिसांना नुसतीच उपाधी देऊन त्यांच्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. काही लोकप्रतिनिधी तर परप्रांतीयांच्या समस्यांच्या भार आपल्याच शिरावर आहे, या तोऱ्यात वावरतात. मात्र, त्या लोकप्रतिनिधींच्या घरापर्यंत कोरोना जाऊ नये यासाठी चिलेपिले सोडून कोरोनाशी लढणाऱ्या पोलिसांबाबत मात्र पकडलेले वाहन सोडण्यास फोन करण्यापुरते कर्तव्य बजावतात.

पालिका प्रशासन लक्ष देईल का ?
पोलिस कर्मचाऱ्यांच्या जुन्या वसाहतीमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, रस्ते, फुटलेले शौचालय अशा अनेक समस्या आहेत. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच्या या समस्या सोडविण्यासाठी नगर पालिका प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक ‘नॉटरिस्पाँडिंग’
जुन्या पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीकरिता काही निधी किंवा योजना आहे का, याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT