Illegal appointment of doctor in achalpur sub district hospital amravati 
विदर्भ

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरची नियमबाह्य नियुक्ती, तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील होमिओपॅथी विभागात नियमबाह्य पद्धतीने डॉक्‍टरची नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नियुक्तीमध्ये तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे त्या डॉक्‍टरची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी होत आहे. 

जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी होमिओपॅथी डॉक्‍टरांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून डॉ. शेजव यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डॉ. शेजव कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस 25 जानेवारी 2021 होता. मात्र, त्यांची सेवानिवृत्ती होण्यापूर्वीच कोणतीही जाहिरात तथा मुलाखत न घेता अमरावती येथील एका डॉक्‍टरची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे या नियुक्तीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची जोरदार चर्चा आहे. सदर नियुक्ती ही नियमबाह्य असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ नव्याने जाहिरात काढावी व स्थानिकांना प्राधान्य देऊन नव्याने डॉक्‍टरची नियुक्त करण्याची मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख प्रीतेश अवघड यांनी केली आहे. यासंदर्भात ते अमरावती येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणार आहेत.

अनुसूचित जातीच्या जागेवर गदा -
उपजिल्हा रुग्णालयातील होमिओपॅथी डॉक्‍टरांची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र, आता याठिकाणी सर्वसाधारण गटातील डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या जागेवर गदा आणण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे संबंधित डॉक्‍टर अमरावती येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. परिणामी स्थानिक डॉक्‍टरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या नियुक्तीमध्ये तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मला काढण्याचे आदेश निघाले  होते. मात्र, त्यावेळी वरिष्ठांकडे तक्रार केल्याने ते आदेश परत घेतले. तथापि, मी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच स्थानिकांना डावलून डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली होती. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
-डॉ. रामदास शेजव, सेवानिवृत्त डॉक्‍टर, परतवाडा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT