esakal | जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा
sakal

बोलून बातमी शोधा

Shubham was burnt alive for a ransom of Rs 30 lakh Chandrapur crime news

शनिवारी येथील बायपास मार्गावरील सहयोग लॉनपासून काही अंतरावरील एका झुडुपात जळालेल्यास्थितीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ टी-शर्ट होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा

sakal_logo
By
मनोज कनकम

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या शुभम दिलीप फुटाणे (वय २५) याचे जानेवारी महिन्यात अपहरण झाले होते. अपहरणकर्त्याने शुभमच्या कुटुंबीयांकडे ३० लाखांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणीची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. यामुळे तब्बल २८ दिवसांनंतर शनिवारी (ता. १३) येथील बायपास मार्गावरील झुडपात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी गणेश पिंपळशेंडे (वय २५) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप फुटाणे यांचा मुलगा शुभम हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. जानेवारी महिन्यात शुभमचे अपहरण करण्यात आले. याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या कालावधीत अपहरणकर्त्यांनी शुभमच्या कुटुंबीयांकडे ३० लाखांची खंडणी मागितली. परंतु, कुटुंबीयांनी ही मागणी पूर्ण केली नाही.

अधिक वाचा - कोरोनाचा उद्रेक! लग्नामध्ये ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई

शनिवारी येथील बायपास मार्गावरील सहयोग लॉनपासून काही अंतरावरील एका झुडुपात जळालेल्यास्थितीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ टी-शर्ट होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. फुटाणे कुटुंबीयांना पाचारण केल्यानंतर मृतदेह शुभमचा असल्याचे टी-शर्टवरून ओळखले.

यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित नागपूर येथून गणेश पिंपळशेंडे याला अटक केली. पोलिस उपअधीक्षक प्रशांत खरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.

‘वीर’च्या अपहणातील आरोपी

येथील वीर सन्नी खारकर या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. वीरला नागपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी गणेश पिंपळशेंडे याला ताब्यात घेतले होते. जामिनावर त्याची सुटका झाल्यानंतर त्याने शुभमचे अपहरण केले. शुभमच्या वाहनावर आढळलेले रक्त आणि पिंपळशेंडे यांच्या रक्ताचा डीएनए सारखा असल्याने पोलिसांनी आरोपी हा शुभमच असल्याचे ठरवित ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, गणेश पिंपळशेंडे हासुद्धा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

जाणून घ्या - कोरोनाचा धोका वाढतोय! बाधितांच्या संपर्कात आल्यास करा चाचणी, अन्यथा संपूर्ण सोसायटी विलगीकरणात

आईने फोन केल्यावर दिली होती धमकी

१७ जानेवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शुभम हा मित्रांसोबत चंद्रपूर मार्गावरील जायका हॉटेलमध्ये जेवण करायला बाहेर जातो असे सांगून दुचाकीने घरून निघाला होता. रात्री बराच वेळ होऊनही शुभम घरी न पोहोचल्याने आईने भ्रमणध्वनीवर संपर्क केला. यावेळी अज्ञात व्यक्तीने आईला तुमच्या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगितले होते. तसाचे ३० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. आरोपीने खंडणी दोन दिवसांत मिळाली नाही तर मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

सऱ्या दिवशी सकाळी घुग्घूस येथील डॉ. दास यांच्या रुग्णालयाजवळ शुभमची दुचाकी आढळली होती. दुचाकीवर रक्ताचे डाग होते. पोलिसांनी रक्ताचे नमुने घेऊन तपासला गती दिली होती. वाहनावंरी रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने साम्य आढळून आल्याने पोलिसांचा संशय खात्रीत बदलला. त्यामुळे आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अधिक माहितीसाठी - VIDEO : याला म्हणतात विश्वास! सात महिलांनी 'बाळू'साठी केला सरपंचपदाचा त्याग

प्रेत पूर्णत: जळालेले

शनिवारी आरोपीला घुग्घूस लगतच्या स्वागत लॉन जवळील घटनास्थळावर पोलिस घेऊन गेले. त्या ठिकाणी शुभम फुटाणे या विद्यार्थ्याचे प्रेत पूर्णत: जळालेल्या अवस्थेत मिळाले. फक्त डोक्याची कवटी तेवढी पोलिसांना हस्तगत करता आली. घटनास्थळावरील परिस्थतीवरून त्याची जाळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा विस्तृत तपास सुरू केला आहे. हत्येची अधिक माहिती लवकरच पुढे येणार आहे, असे पोलिसांचे म्हणने आहे.

loading image