wardha news  
विदर्भ

दुर्दैवी! शेतात पाणी देण्यासाठी गेला तो परतलाच नाही; ऐन धुलीवंदनाच्या हळहळलं संपूर्ण गाव

मोहन सुरकार

सिंदी रेल्वे (जि. वर्धा)  : जिल्हातील पळसगाव बाई येथे एका १८ वर्षीय तरुणाने धुलीवंदनाच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सणाच्या दिवशी अख्ख्या गावात स्मशान शांतता पसरली होती.

हेही वाचा - शेवटी हे नागपूरच! हत्येला विशेष कारणाची गरज नाही; रक्तरंजित ठरली यंदाचीही धुळवड
 
सविस्तर वृत्त असे की लगतच्या पळसगाव बाई येथील सुमीत सुधाकर भट (वय १८) या इयत्ता बारावीत शिकणार्‍या तरुन मुलाने संपूर्ण गाव धुलीवंदनाचा आनंद घेत असताना सोमवारी (ता.२९) स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपविले. 

शेतात गोठ्याचे सुरु असलेल्या बांधकामवर पाणी मारण्यासाठी गेलेला सुमीत संध्याकाळ झाली तरी घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. आणि सदर घटना रात्री उशिरा उघडकीस आली. 

नेहमी हसतमुख राहणारा सुमीत मनमिळावू स्वभावाचा होता. शिवाय तो गावातील नावाजलेल्या संत सखुआई स्पोर्टींग कल्बचा अष्टपैलू कबड्डीपटु होता. त्यांच्या अशा आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण गावावर सणाच्या दिवशी शोककळा पसरली होती.

हेही वाचा - होळीच्या दिवशी कोविड वॉर्डात रुग्णाची आत्महत्या; उपचार...
 
सदर घटनेची सिंदी पोलिसांनी नोंद केली असुन आत्महत्येच्या कारणाचा सिंदी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात सिंदी पोलिस कसुन तपास करत आहेत. सुमीतचे पार्थीव उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT