शेवटी हे नागपूरच! हत्येला विशेष कारणाची गरज नाही; रक्तरंजित ठरली यंदाचीही धुळवड

Friend stabbed to death in Nagpur Murder news
Friend stabbed to death in Nagpur Murder news

नागपूर : उपराजधानीतील धुळवड म्हणजे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. दरवर्षीच धुळवडीला खून, चाकूहल्ला, रक्तपात आणि गॅंगवार ठरलेलेच असते. मग यंदाच वर्षे याला कस मुकणार होतं. यावर्षीसुद्धा धुळवड रक्तरंजित झाली. मोक्षधाम घाटाजवळ दोन मित्रांनी एकाला तलवारीने भोसकून खून केला. तर अजनीत दोघांनी दारू न पाजल्याच्या कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करीत खून करण्याचा प्रयत्न केला. लखन पप्पू गायकवाड (३२, रा. तकीया, धंतोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर साहील मंगेश रंगारी (२२, रा. जयभीमनगर, अजनी) असे जीवनमृत्यूशी संघर्ष करीत असलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन ऊर्फ बाबा मंडळ (रा. कौशल्यानगर), तन्मय ऊर्फ भद्या नगराळे (३०, रा. कौशल्यानगर) आणि लवन गायकवाड हे तिघे सोमवारी सायंकाळी सहा वाजता मौक्षधाम घाटाजवळ दारू पीत बसले होते. दरम्यान, जुन्या वादातून तिघांमध्ये भांडण झाले. दारूच्या नशेत असलेल्या बाबा आणि भद्याने तलवारीने लखनवर सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला.

काही तासातच लखनचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मेडिकलमध्ये रवाना केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

अजनीत खून करण्याचा प्रयत्न

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयभीमनगरात गल्ली क्रमांक एकमध्ये तरुण मंगेश रंगारी (१९) आणि भाऊ साहील रंगारी (२२) हे राहतात. वडील नसल्यामुळे मिळेल ते काम करतात. त्यांचा मित्र प्रतीक सुनील खोब्रागडे (२१, रा. कुकडे ले-आउट) हा सोमवारी दुपारी अडीच वाजता घरी आला. त्याने होळीनिमित्त दारू पाजण्याचा तगादा लावला. मात्र, त्याला नकार दिली. चिडलेल्या प्रतीकने तरुणला शिवीगाळ केली. तरुणनेही त्याला हातातील कडे मारले. त्यानंतर प्रतीक तेथून गेला.

काही वेळातच प्रतीक आणि त्याचा भाऊ रितीक हे दोघेही तरुणला धडा शिकविण्यासाठी त्याच्या घरी आले. त्यावेळी तरुण घरी नव्हता तर त्याचा भाऊ साहील झोपला होता. प्रतीक आणि रितीकने साहीलवर हल्ला केला. साहीलच्या छातीत चाकू भोसकल्यामुळे तो बेशुद्ध पडला.

आईने आरडाओरड केला असता शेजाऱ्यांनी धाव घेतली. नागरिक गोळा झाले. एकाने अजनी पोलिसांनी फोन केला. पोलिसांनी साहीलला मेडिकलमध्ये दाखल केला. याप्रकरणी तरुणच्या तक्रीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

तरुणीवर हल्ला

तिसरी घटना मिनीमाता नगरमध्ये घडली. असामाजिक तत्त्वाने हुल्लडबाजी करीत वानखेडे परिवारावर तलवारीने हल्ला केला. त्या हल्ल्यात कुटुंबातील तरुणीच्या हाताला गंभीर इजा झाली. तिला उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

नागपूरच्या होळीचा रक्तरंजित इतिहास

नागपुरात होळीचा आजवरचा इतिहास हा रक्तरंजित राहिला आहे. यामुळेच नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शहरातील पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना बोलावून विशेष सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, शेवटी हे नागपूर आहे. हत्येला, हत्येच्या प्रयत्नाला विशेष कारण लागत नाही. यामुळेच शहरात तीन रक्तरंजित घडना घडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com