leopard found dead in selu of wardha 
विदर्भ

कालव्यात दिसला कुत्रासदृश्य प्राणी, जवळ जावून बघताच उडाली भंबेरी

सकाळ वृत्तसेवा

सेलू (जि. वर्धा) : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीतून सेलडोहकडे कालवा जातो. त्या परिसरात नामदेव चचाणे हे शेळ्या चारण्यासाठी गेले. त्यावेळी कालव्याच्या दिशेने जाताच पाण्यात कुत्रासदृश्य प्राणी दिसला. जवळ जाऊन बघताच तो बिबट असल्याचे समजले. रविवारी ही घटना घडली असून त्यामुळे खळबळ माजली होती.

नामदेव यांनी कालव्यात डोकावून पाहण्याची हिम्मत केली. त्यानंतर बिबट्याच्या हालचाली दिसल्या नाहीत. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असे त्यांना वाटले. त्यांनी लगेच याची माहिती कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दिली. त्याने वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे सेलू येथील क्षेत्र सहायक डी. आर. पाटील, क्षेत्र सहायक केळझर एन. के. पाचपोर, कोल्हे, मानव वन्यजीव रक्षक कौशल मिश्रा, वनरक्षक खेलकर, चोरे, धोंगडे, बकावटे, बावणे हे घटनास्थळी पोहोचले. मृत्यू झाल्याची खात्री पटताच त्यांनी पंचनामा केला. 

पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत वरभे, डॉ.प्रकाश भिसेकर व डॉ. संजय खोपडे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या बिबट्याचा मृत्यू एक दिवसाआधी झाला असावा. यावेळी उपस्थित वनसंरक्षक तेंदू व वन्यजीव अधिकारी ठाकूर यांनी या बिबट्याचा मृत्यू उपासामुळे झाल्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे. फिरते पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनोने यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळीच बिबटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: कोलकाताने अखेर विजय मिळवला; राजस्थानला Rinku Singh चा झेल सोडणे महागात पडले, मुंबई इंडियन्सला धक्का

तोरणागडावर थरारक प्रसंग! मुंबईचा पर्यटक २०० फूट खोल दरीत पडला, अंधारात दोरखंड टाकून पर्यटकाला वर काढले, स्थानिकांच्या तत्परतेने टळला अनर्थ..

Pune Crime : हुंडाबळीचा विळखा: वाघोली-आव्हाळवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहितांचा गळफास घेऊन मृत्यू

OpenAI मध्ये सर्वोच्च पद, कोट्यवधी रुपयांचं पॅकेज...तरीही का सगळं सोडून भारतात परतत आहेत श्रीनिवास नारायणन?

Team India: सूर्यकुमार यादवचा गेम होणार अन् श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कॅप्टन होणार?

SCROLL FOR NEXT