esakal | वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

Veg ordered online and non-veg received

समीर यांनी लगेच ‘बार्बेक्यू नेशन’ येथे फोन केला. त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी हॉटेलचा व्यवस्थाकाचा प्रतिनिधी देशपांडे यांच्या घरी येऊन माफी मागितली आणि दुसरे पार्सल देण्याचे कबूल केले.

वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘व्हेज बॉक्स थाली’ स्विगीच्या माध्यमातून बुक करण्यात आली. मात्र, हॉटेलने त्यांना ‘नॉनव्हेज’ असलेला बॉक्स पाठवला. त्यामुळे मुलाच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या नातेवाइकांच्या आनंदावर विरजण पडले. या प्रकाराची तक्रार केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाने माफी मागितल्याची माहिती आहे. 

समीर देशपांडे हे कुटुंबासह त्रिमूर्तीनगरात राहतात. त्यांचा मुलगा निरायम याचा २१ जानेवारीला वाढदिवस होता. त्यामुळे घरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात लखनऊ येथे राहणाऱ्या निरामयच्या बहिणींनी ट्रीट म्हणून जवळपास १ हजार ५०० रुपये किंमतीची दोन ‘व्हेज बॉक्स थाली’ स्विगीवरून बुक केली. स्विगीच्या माध्यमातून सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ या हॉटेलमधून दुपारी साडेचार वाजता जेवणाचे पार्सल डीलिव्हर होणार होते.

जाणून घ्या - स्वयंपाक करताना महिलेला अचानक आली दुर्गंधी अन् क्षणात उध्वस्त झाला सुखी संसार; परिसरात हळहळ

घरात मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही वेळातच जेवणाचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय आला. त्याने समीर देशपांडे यांच्या हाती पार्सल दिले आणि निघून गेला. काही वेळातच सर्व नातेवाईक जेवणासाठी बसले. बॉक्स उघडला. त्यामध्ये व्हेज ऐवजी चक्क नॉनव्हेज निघाले. डब्यात चिकन बघताच सर्वांचा मूड ऑफ झाला. सर्व जण घासही न घेता उठले.

समीर यांनी लगेच ‘बार्बेक्यू नेशन’ येथे फोन केला. त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी हॉटेलचा व्यवस्थाकाचा प्रतिनिधी देशपांडे यांच्या घरी येऊन माफी मागितली आणि दुसरे पार्सल देण्याचे कबूल केले. मात्र, देशपांडे यांच्या घरी चक्क चिकन डिलीव्हर झाल्यामुळे ते मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करू शकले नाही.

हॉटेलची प्रतिमा मलिन झाली
सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ येथून आलेल्या जेवणाच्या बॉक्समधून चक्क चिकन घरी पोहोचले. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या. आमच्या मनात असलेली हॉटेलची प्रतिमा मलिन झाली आहे. असा प्रकार भविष्यात कुणासोबत घडू नये. 
- समीर देशपांडे

जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

चूक अनवधानाने झालेली
अशा चुका होत असतात. चुकीने व्हेजच्या जागी नॉनव्हेज पाठविण्यात आले. ही चूक अनवधानाने झालेली आहे. 
- ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेल प्रतिनिधी